जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
पार्थ पवारचे एफआयआरमध्ये नाव नसल्यामुळे, दमानिया यांनी थेट मागणी केली. त्या म्हणाल्या की, "सध्या जो FIR आहे त्यामध्ये अमेडिया एंटरप्राइजेसचे नाव नाही, याचाच अर्थ पार्थ अजित पवारच नाव नाही

Anjali Damania on Ajit Pawar: पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्कमधील महार वतनामधील तब्बल 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये हडप करण्याचा डाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar Amedia Enterprises case) यांच्या अंगलट आला. जमीन घोटाळा समोर आल्यानंतर पार्थ पवार यांच्याकडून जमीन परत देण्याबाबत सुतोवाच करण्यात आले. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कायद्यावर बोट ठेवत जमिनीचा अधिकार नसताना व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत पार्थ पवारसह अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 42 कोटी देत हा व्यवहार कोणीच रद्द करू शकत नाही. सार्वजनिक मालकीची जमीन असल्याचे तिचा व्यवहार करण्याचे अधिकार सरकारकडे आहेत. त्यामुळे या जमीन व्यवहारात अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना निष्पक्ष चौकशी होईल का? अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली.
व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच नाही (Pune Koregaon park land scam)
अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले की या जमीन व्यवहाराच्या रद्द लेखामध्ये (रद्द करण्याचे पत्र) अमेडिया एंटरप्रायझेसचा थेट सहभाग आहे, परंतु त्यांच्या मते त्यांना हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच नाही. दमानिया म्हणाल्या की, "हा व्यवहार रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शितल तेजवानी करू शकते. कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाहीत. कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाहीत". त्यांनी हेही स्पष्ट केले की अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीतर्फे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी सादर केलेल्या रद्द लेखाबाबत सह दुयम निबंधकांनी पत्र दिले होते. अंजली दमानिया यांनी अमेडिया एंटरप्रायझेस आणि पार्थ पवार यांच्या थेट संबंधावर जोर दिला, ज्यामुळे त्यांना या संपूर्ण व्यवहाराची पूर्णपणे कल्पना होती हे सिद्ध होते, असे सांगितले.
पार्थ पवारला व्यवहाराची कल्पना होती
अंजली दमानिया म्हणाल्या की, अमेडिया एंटरप्रायझेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. अमेडिया एंटरप्राईजेस एलएलपीमध्ये "ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत" असा एक पेपर माध्यमं दाखवत आहेत. या पेपरद्वारे भागीदार म्हणतात की "या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत. याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे. याचाच अर्थ पार्थ पवारला आणि एमआयडी एंटरप्रायझेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती" त्या म्हणाल्या की, पार्थ पवारची भागीदारी 99 टक्के (99 टक्के पार्टनरशिप) आहे, आणि दिग्विजय पाटीलची भागीदारी 1 टक्का आहे. फसवणूक (फ्रॉड) झाल्यामुळे, अमेडिया एंटरप्रायझेसची आणि भागीदारांची जबाबदारी मर्यादित (लिमिटेड) राहत नाही, असा महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा दमानिया यांनी उपस्थित केला. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008 (Limited Liability Partnership Act 2008) हा कायदा यावर लागू होतो, असे त्यांनी सांगितले.
पार्थ पवार एफआयआर नोंदवला पाहिजे
सध्याच्या एफआयआरमध्ये कंपनीचे आणि पार्थ पवारचे नाव नसल्यामुळे, दमानिया यांनी थेट मागणी केली. त्या म्हणाल्या की, "सध्या जो FIR आहे त्यामध्ये अमेडिया एंटरप्राइजेसचे नाव नाही, याचाच अर्थ पार्थ अजित पवारच नाव नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. पार्थ पवार आणि अमेडियावर देखील ताबडतोब हा एफआयआर झाला पाहिजे. या प्रकरणाव्यतिरिक्त, अंजली दमानिया यांनी अजित पवारांशी संबंधित कंपन्यांच्या इतर व्यवहारांची मालिका उघड करण्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, मी मालिकाच करायच ठरवलं आहे. अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्या जमिनीचे किती व्यवहार झालेत हे सगळं मी हळूहळू काढणार असल्याचे जाहीर केले.
इतर महत्वाच्या बातम्या























