Headlines 24 January : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक; जाणून घ्या आज दिवसभरातील घडामोडी
Headlines 24 January : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवाय गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया आज होणार आहे.
Headlines 24 January : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे. याबरोबरच गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रियाआज होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहे. शिवाय अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात नाईक कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे.
मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया
गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रियाआज होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींना हजर राहण्याची नोटीस जारी केलीय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नशिक दौऱ्यावर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता हात से हात जोडो कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर पदवीधर मतदारसंघच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची बैठक होणार आहे.
अर्णब गोस्वामींविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात नाईक कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
राखी सावंतच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी
अभिनेत्री राखी सावंत हिने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. एका प्रसिद्ध मॉडेलने दिलेल्या तक्रारीनुसार राखीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेल्या मुलांशी पंतप्रधान मोदी साधणार संवाद
राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेल्या मुलांशी पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय बाल पुरस्कार बीडच्या राजुरी येथील 15 वर्षाच्या रोहन रामचंद्र बहिर याला मिळालाय.
केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक
आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक होआर आहे.
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होआर आहे. आज दुपारी 1 वाजता जम्मू-काश्मीरमधील इज्जर कोटलीमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे.
इंदौरमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटाचा सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज दुपारी 1.30 वाजता इंदौरच्या होळकर स्टेडीयमवर होणार आहे. याबरोबरच आजच रणजी ट्रॉफीत दिल्ली आणि हैदराबाद यांचा सामना होणार आहे.