(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supeme Court : शिंदे गट हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, सूत्रांची माहिती
दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे.
मुंबई : दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. उद्या पर्यंत याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
हायकोर्टाने शिंदे गटाचे म्हणणे ऐकले नाही. तसेच सदा सरवणकरांची याचिका ही आमची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याची होती. सदा सरवणकरांचे म्हणणे हायकोर्टाने ऐकून घेतले नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सुप्रीम कोर्टात करण्यात येणाऱ्या याचिकेत आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे त्यामुळे आम्हाला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा करण्याची परवानगी द्यावी, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील याचिकेत शिंदे गटाने केली आहे. हायकोर्टाच्या निकालाची अंतीम कॉपी हातात आल्यानंतर आज किंवा उद्या याचिका दाखल करण्यात येणार आहे. अंतीम निर्णयाची कॉपी हातात आल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटाला
ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.
संबंधित बातम्या :
Shiv Sena Dasara Melava Verdict: ठाकरेंचा पहिला मोठा विजय, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी
Dasara Melava 2022 : कोर्टाचा निर्णय मान्य, आम्ही बीकेसीवर दसरा मेळावा घेऊ - भरत गोगावले