Sharad Pawar : थकणार नाही, झुकणारही नाही, कुणाला सांगताय म्हातारा झालोय? राष्ट्रवादीकडून शरद पवारांचा जुना व्हिडीओ शेअर करत भावनिक साद
Sharad Pawar NCP Video : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला असून कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
Ajit Pawar Vs Sharad Pawar : कुणाला सांगताय म्हातारा झालोय? तुम्हाला काय ठाऊक आहे अजून जोपर्यंत तुमची साथ आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, थांबणार नाही, हे शब्द आहे शरद पवारांचे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून त्यांचा एक जुन्हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार गटाने कार्यकर्त्यांना भावनिक साद घातल्याचं दिसून आलंय.
शरद पवारांचा हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळीही त्यांच्यावर वय झाल्याची टीका करण्यात येत होती, आताही करण्यात येतेय. वेगळा सवतासुभा मांडल्यानंतर अजित पवारांनी तर त्यांच्या वयावरून अनेकदा वक्तव्यं केली आहे. वरिष्ठांनी निवृत्ती घ्यावी आणि मार्गदर्शन करावं असं त्यांनी म्हटलं होतं.
आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून येतंय. अजित पवार गटाकडून मोठा जल्लोष करण्यात येत आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाकडून जुन्या व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं आहे.
काय म्हटलंय व्हिडीओमध्ये? (Sharad Pawar Viral Video)
या व्हिडीओमध्ये शरद पवार म्हणतात की, मी आता 80-82 वर्षाचा झालोय असं सांगता, कुणाला सांगताय म्हातारा झालोय. तुम्हाला काय ठाऊक आहे अजून. तुम्ही काय त्याच्या खोलात जाऊन पाहिलंय. जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, थांबणार नाही.
२०२२च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!#sharadpawar… pic.twitter.com/agB3W4nROh
— NCP (@NCPspeaks) February 6, 2024
राष्ट्रवादीच्या ट्विटमध्ये काय म्हटलंय?
2022 च्या व्हिडrओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!
अजित पवारांसोबत किती आमदार?
- महाराष्ट्रातील 41आमदार
- नागालँडमधील 7 आमदार
- झारखंड 1 आमदार
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5
- राज्यसभा 1
शरद पवारांसोबत किती आमदार?
महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा - 3
पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
ही बातमी वाचा: