Sharad Pawar, CM Eknath Shinde : शरद पवार अन् मुख्यमंत्री शिंदेंच्या तासाच्या बैठकीत एकाच मुद्यावर 20 मिनिटे काथ्याकूट; शिंदेंनी कोणतं आश्वासन दिलं?
शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे 20 मिनिटे चाललेल्या बैठकीत सर्वाधिक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन जातींमध्ये मतभेद निर्माण होऊ नयेत, अशी चर्चा झाल्याचे समजते.

Sharad Pawar, CM Eknath Shinde : मराठा आणि ओबीसी यांच्यातील वाढत्या कलहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) सुप्रिमो शरद पवार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीबाबत पवार किंवा शिंदे यांनी भाष्य केलेलं नाही. मात्र, कोणत्या मुद्यांवर सर्वाधिक काथ्याकूट करण्याता आला, याबाबत आता सूत्रांनी माहिती दिली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे 20 मिनिटे चाललेल्या बैठकीत सर्वाधिक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन जातींमध्ये मतभेद निर्माण होऊ नयेत, अशी चर्चा झाल्याचे समजते. याच मुद्यावर सर्वाधिक चर्चा झाल्याचे समजते. दोघांमध्ये आरक्षणावर स्वतंत्रपणे चर्चा झाली.
मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना कोणतं आश्वासन दिलं?
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आतापर्यंत काय प्रयत्न केले याची माहिती शरद पवार यांना दिली. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काय काम केले आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री पुन्हा एकदा सर्व पक्षांना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेचे निमंत्रण पाठवतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना दिले. दुसरीकडे, या बैठकीत जलस्रोत, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांशी संबंधित काही प्रलंबित बाबींसह विविध मुद्द्यांवर त्यांनी सखोल चर्चा केली, असे शिवसेनेने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे.
मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली की नाही हे अद्याप समजलं नव्हतं. मात्र, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चा झाली असल्याचे स्पष्ट होते. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या आठवड्यात, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पवार यांना मुंबईतील निवासस्थानी भेटायला गेले. पवार यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान भुजबळांनी त्यांना पुढाकार घेऊन समस्या सोडवण्याची विनंती केली जेणेकरून दोन समाजातील तेढ संपुष्टात येईल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
