(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : मराठीची आर्थिक कोंडी करायची अन् कार्यक्रम घेऊन ढोंग करायचे : संजय राऊतांचा भाजपवर आरोप
श्रेय कोणीही घ्या पण मराठीचा मान राखा - शिवसेना खासदार संजय राऊत
Sanjay Raut : जगभरात साजरा केला जाणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांपासून अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात, उल्लेख करतात असं म्हटलं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्या शिवरायांच्या भाषेसाठी तुमच्याकडे सतत दारात येऊन भीक मागावी लागते याचा कुठेतरी विचार व्हायला हवा अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली आहे.
तर, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेनेसुद्धा ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे आणि आपल्या भाषेवर असा अन्याय कुणी सहन करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, मुंबई पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने (Income tax department) ठाप मारली. या प्रकरणी राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना असं वाटत आहे की, इन्कम फक्त महाराष्ट्रात आहे. खरंतर, सर्वात जास्त टॅक्स मुंबई आणि महाराष्ट्र केंद्राला पुरवत असतो असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेला कोण किती त्रास देतं याची जनता नोंद घेत आहे असा टोला संयज राऊत यांनी केंद्राला दिला आहे.
तर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही अशी बदनामी करण्याची मोहीम सगळीकडे सुरू आहे पण आम्ही वाकणार नाही. असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मराठी माणसाची एका बाजूला बदनामी करायची आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू द्यायचा नाही. मराठीची आर्थिक कोंडी करायची, मराठी माणसाच्या हातात पैसे राहू द्यायचे नाहीत, तर, दुसऱ्या बाजूला मराठी कट्टा यांसारखे कार्यक्रम घेऊन ढोंग करायचे हे लोक भारतीय जनता पार्टीची आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bajarang Sonwane : सांगा बजरंग बप्पाचे चुकले काय? बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवर सोनवणे समर्थक नाराज
- Dr Suhas Jewalikar : सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ.सुहास जेवळीकर यांचं निधन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha