Pune SSC, HSC Board Exam : कॉपी बहाद्दरांवर करडी नजर; पुण्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. राजेश देशमुख यांनी आता पुणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर इंटरनेच सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune SSC, HSC Board Exam : दहावी (SSC exam) आणि बारावीच्या (HSC exam) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कडक नियमावली तयार केली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. राजेश देशमुख यांनी आता पुणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर इंटरनेच सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक परीक्षा आणि माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी ही कडक नियमावली तयार करण्यात आली आहे.
21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 25 मार्च, 2023 रोजी 8 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे आणि 2 मार्ज ते 25 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ही कडक नियमावली तयार करण्यात आली आहे.
या नियमावलीनुसार जिल्ह्यातील ग्रामीण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या परीसरात आणि त्यासभोवतालच्या 100 मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेले शिक्षक, अधिकारी, कर्मचारी हे वगळता इतर कोणत्याही खाजगी व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परीसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश संबंधित केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना लागू होणार नाहीत.
त्या परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरातील सार्वजनिक फोन, एसटीडी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र, ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाईल, प्रसार माध्यमं यासारख्या सर्व संपर्क साधनं बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप आणि कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास आणि परिसराच्या 100 मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई करण्याचा आदेशदेखील लागू केला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत डॉ. देशमुख यांनी आदेशात सांगितलं आहे.
लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा
मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे. त्यामुळे कॉपी बहाद्दरावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे आदेश घेण्यात काढण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
