एक्स्प्लोर

NCP crisis LIVE : शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा; सोमवारी पुन्हा सुनावणी

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर आता निवडणूक आयोगात आजची सुनावणी झाली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित राहिले होते.

नवी दिल्ली : पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची आहे आणि आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाने केला. तसेच शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात आणि जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा दावाही  अजित पवार गटाने केला. दरम्यान यावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असून अजित पवार गट पुन्हा युक्तिवाद करणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP crisis) फाटाफुटीनंतर आज सर्वात मोठी सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची (Nationalist Congress Party), घड्याळ (NCP Symbol) हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार याबाबत सुनावणी झाली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे स्वत: नवी दिल्लीत सुनावणीला उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असा सामना आज निवडणूक आयोगात रंगला. 

शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Singhvi) तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल (Neeraj Kishan Kaul) आणि मनिंदर सिंह (Maninder Singh) हे युक्तिवाद करत आहेत. महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं पक्षावर नेमकं कुणाचं वर्चस्व राहणार याचं उत्तर या सुनावणीत मिळणार आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar : निवडणूक आयोगातील सुनावणी 

  • दुपारी चारच्या सुमारास निवडणूक आयोगातील सुनावणीला सुरुवात
  • स्वत: शरद पवार सुनावणीसाठी निवडणूक आयोगात दाखल
  • शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित
  • शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित
  • अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी कोणीही उपस्थित नाही
  • अजित पवार गटाकडून पक्ष घटनेचा दाखला
  • कोणत्याही नियुक्त्या एका पत्राद्वारे होतात, अजित पवार गटाचा युक्तिवाद
  • 24 पैकी 22 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमच्या बाजूने हा शरद पवार गटाचा दावा अजित पवार गटाकडून खोडण्याचा प्रयत्न
  • आमदारांची संख्या आमच्या बाजूने, अजित पवार गटाचा दावा
  • महाराष्ट्र आणि नागालँडचेही आमदार आमच्या बाजूने, अजित पवार गटाचा युक्तिवाद
  • पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निघून गेला, त्यामुळे आमदारांची संख्या हाच महत्त्वाचा मुद्दा - अजित पवार गट
  • जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर, अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा
  • पक्षाची स्थापना कशी झाली? पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात अजित पवार गटाचा युक्तीवाद
  • 55 आमदार आणि 2 खासदारांचा आम्हाला पाठिंबा, अजित पवार गटाचा दावा.
  • एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला, पण मूळ पक्ष आमचाच, शरद पवार गटाचा प्रतिदावा 
  • आमदार सोडून गेले असले तरी पक्षावरचा दावा आमचाच योग्य आहे- शरद पवार गट
  • शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड 10 सप्टेंबर 2022 च्या कथित कार्यकारणीत झाली, पण 1 सप्टेंबर च्या बैठकीचेच जे मिनिट्स आहेत त्यात हे होणारच होतं हे दिसतं. त्यामुळे ही निवड योग्य नाही -अजित पवार गटाचा दावा
  • ज्या 558 डेलिगेट्सच्या आधारे त्यांची निवड झाली ते सर्वच्या सर्व बेकायदेशीर आहेत. कारण राज्य नियुक्त्या घटनेप्रमाणे झालेल्या नाहीत.
  • निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, शरद पवार गटाची मागणी.

55 आमदार आणि 2 खासदारांचा आम्हाला पाठिंबा, अजित पवार गटाचा दावा

महाराष्ट्र विधानसभेचे 53 पैकी 42, विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आणि नागालँडमध्ये 7 पैकी 7 असे 55 आमच्या पाठिशी, तर लोकसभेत 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहे - अजित पवार गट 

 पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही. केवळ एका पत्राद्वारे पक्षात नियुक्त्या कशा प्रकारे होऊ शकतात - अजित पवार गटाचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष कोणाचा? हे ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे.

शिवसेनेनंतर आणखी एक चिन्हाची लढाई

शिवसेनेनंतर आणखी एक चिन्हाची लढाई  निवडणूक आयोगात सुरु आहे. आधी शिवसेना कुणाची यावर घमासान झालं.आता राष्ट्रवादी नेमकी कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगात होणार आहे. 2 जुलैला अजित पवार गटानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या लढाईतली ही पहिली तारीख आहे. 

पक्षात फूट आहे की नाही याचा फैसला करत निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा आहे. शरद पवार गटाचा दावा आहे की पक्षात फूट नाही, पक्ष आमचाच आहे. पक्षाची घटना, आमदार खासदारांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या या गोष्टी तपासत निवडणूक आयोगानं निर्णय घेणं अपेक्षित आहे. अनेकदा अंतिम निर्णयाआधी निवडणूक तात्पुरता निर्णय म्हणून चिन्ह गोठवतं.या केसमधे काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.

शिवसेनेप्रमाणे याही लढाईत शपथपत्रं, कागदपत्रांची लढाई जोरदार आहे. पवार गटाकडून 8 ते 9 हजार कागदपत्रं सादर झाल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार गटापेक्षाही कागदपत्रं जास्त असल्याचाही दावा केला जातोय. पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडणार असल्याचं कळतंय.

राष्ट्रवादीतल्या चिन्हाच्या लढाईचा घटनाक्रम

-2 जुलै रोजी अजित पवार गटाचा शपथविधी
- शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात 5 जुलै रोजी  कॅव्हिएट दाखल
-अजित पवार गटानं 30 जून रोजीच झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा केला, 40 आमदार आपल्या बाजूनं असल्याचाही दावा
-निवडणूक आयोगानं त्यावर दोन्ही बाजूंना नोटीसा देत 8 सप्टेंबर पर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलं
-दोन्ही बाजूची कागदपत्रं पाहिल्यानंतर आयोगानं आता या सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget