लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे? तिसरी अट वाचा मगच करा सही; अन्यथा...
सध्या राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होता आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
मुंबई : सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेची सर्वत्र चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, या योजनेतील अटीमध्ये महाराष्ट्र सरकारने अनेक बदल केले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यायचे आहे. याच हमीपत्रावर सही करताना ते काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. सर्व अटी समजून घेऊनच त्यावर सही करणे गरजेचे आहे. हमीपत्रावर नमूद केलेल्या तिसऱ्या अटीकडे विशेष रुपाने लक्ष देण्याची गरज आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमके काय आहे?
माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यावे लागते. हे हमीपत्र म्हणजे एका प्रकारचे स्वयंघोषणापत्र आहे. या हमीपत्रावर तुम्हाला एकूण आठ स्वयंघोषणा करायच्या आहेत. हमीपत्रावर प्रत्येक घोषणेची (अट) सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. महिलांनी या स्वयंघोषणा व्यवस्थित वाचून डाव्या बाजूच्या चौकोनावर खून करायची आहे. तसेच अर्जदार महिलेने काली उजव्या कोपऱ्यात सही करायची आहे.
तिसऱ्या स्वयंघोषणेचा नेमका अर्थ काय?
हमीपत्रातील तिसरी स्वयंघोषणा फार महत्त्वाची आहे. यामध्ये अर्जदार महिलेच्या कुंटुंबातील सदस्य सरकारी नोकरदार, सरकारी खात्यात कंत्राटी, करार पद्धतीने काम करत नाहीये, याची सरकारला हमी द्यावी लागणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात, मंडळात नोकरीवर असेल तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
तिसऱ्या स्वयंघोषणेत नेमकं काय आहे?
"मी स्वत: किंवा माझ्या कटुंबातील सदस्य नियमीत/ कायम/ कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत," असे हमीपत्राच्या तिसऱ्या स्वयंघोषणेत लिहिलेले आहे. त्यामुळे एखाद्या महिलेच्या कुटंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजना, ॲपमध्ये कोणकोणती माहिती भरायची? सोप्या टिप्स फॉलो करा, निश्चिंत राहा!
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीत मोठी अडचण; तहसिलदार संघटना आक्रमक