Maharashtra Weather : मुंबई, पुण्यासह राज्यात गारठा वाढला, नाताळनंतर थंडी आणखी वाढणार
Cold Weather in Maharashtra : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. राज्यात पुढील पाच दिवस कोरडं वातावरण राहणार आहे.
![Maharashtra Weather : मुंबई, पुण्यासह राज्यात गारठा वाढला, नाताळनंतर थंडी आणखी वाढणार Maharashtra Weather Cold Weather in Maharashtra till christmas marathi news Maharashtra Weather : मुंबई, पुण्यासह राज्यात गारठा वाढला, नाताळनंतर थंडी आणखी वाढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/19/cb64a957e0393d99b96c68dc98be254c1702970710036275_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Cold Weather : देशासह राज्याततील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. हवामानात (Weather Forecast) सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या थंडी (Cold Weather) वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार आहे. सोमवारपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यात लोक गरम कपडे घालून घराबाहेर पडताना दिसत आहे. नाताळवेळी मात्र राज्यातील तापमान किंचित वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हुडहुडी
राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशाखाली गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमान एका अंकांवर आलं आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. विदर्भासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.
हिंगोली जिल्ह्यात हुडहुडणारी थंडी
पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात शहराचे तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. मात्र सोमवारपासून मुंबईच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 25 डिसेंबरनंतर मुंबई आणि उपनगरात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी मुंबईतील IMD च्या सांताक्रूझ हवामान केंद्रात किमान तापमान 23.7 अंशांवर पोहोचले, जे सामान्यपेक्षा सहा अंशांनी जास्त आहे. तर कुलाबा येथील हवामान केंद्रात किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती, जी 19.4 अंश होती.
नाताळनंतर तापमानात घट
अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. याचा परिणाम देशासह राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे. आता काही दिवस तापमानात वाढ होताना दिसेल. मात्र, 25 डिसेंबरनंतर वेस्टर्न डिस्टबर्न्स तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पण, तोपर्यंत किमान तापमान 21 ते 22 अंशांच्या दरम्यान राहील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weather Update : तमिळनाडूमध्ये पावसाचा कहर! धुके आणि बर्फवृष्टीने उत्तर भारत गारठला; आजचं हवामान कसं असेल?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)