Kolhapur Uttar Vidhan Sabha : अडीच वर्षांपूर्वी उमेदवारी फायनल, अर्ज भरण्याचा मुहूर्तही ठरला, तरीही राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तरमध्ये वेटिंगवर!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना संधी देण्यात आली आहे. त्यांची लढत काँग्रेसचे राहुल पाटील यांच्याशी होणार आहे.
Kolhapur Uttar Vidhan Sabha : भाजपकडून पहिली यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 eknath Shinde Shiv Sena Candidate List) मंगळवारी रात्री उशिरा पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून 45 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.यामध्ये बहुतांश शिंदे गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आले आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडाळी केल्यानंतर ज्या आमदारांनी त्यांना साथ दिली होती, त्या सर्वच आमदारांना जवळपास संधी देण्यात आली आहे. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना संधी देण्यात आली आहे. त्यांची लढत काँग्रेसचे राहुल पाटील यांच्याशी होणार आहे.
राधानगरीमधून प्रकाश आबिटकर यांना संधी
दुसरीकडे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यांची लढत ए वाय पाटील किंवा के पी पाटील या दोघांपैकी एकाटच्या विरोधात होण्याची शक्यता आहे. या मेहुण्या पाहुण्यांची उमेदवारी मिळण्यासाठी तगडी स्पर्धा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये ज्यांच्या वाटेला मतदारंसघ जाईल त्या पक्षाकडूनच या दोघांपैकी एकाला उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून काँग्रेसने दावा केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जागावाटपामध्ये हा मतदारसंघ कोणाकडे जातो याची सुद्धा उत्सुकता असेल.
राजेश क्षीरसागर पहिल्या यादीत वेटिंगवर!
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तरचा विषय महायुती महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेचा होऊन गेला आहे. या मतदारसंघावर भाजपकडून आक्रमकपणे दावा करण्यात आल्याने गेल्या अडीच वर्षांपासून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्त ठरवूनही माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचे क्षीरसागर अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्येही त्यांनी शक्तीप्रदर्शन करत महाडिक गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून अजूनही सस्पेन्स कायम आहे.
कोल्हापूर उत्तर मध्ये 2022 मध्ये काँग्रेस आमदार चंद्रकात चाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून सत्यजित कदम रिंगणात होते. त्यांनी 80 हजारांवर मते घेत काँग्रेसला चांगली लढत दिली होती. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. भाजपकडून खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव आदी इच्छुक आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडूनही इच्छुकांची यादी मोठी आहे. मात्र, मतदारसंघ शिवसेना ठाकरे कटाकडे जातो की काँग्रेसकडे जातो याची स्पष्टता अजूनही आलेली नाही. त्यामुळे कोल्हापूर उत्तरचा तिढा दोन्हीकडे सुटला नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.
शिंदे गटात प्रवेश करून कृष्णराज यांना उमेदवारी दिली जाणार का?
दोनच दिवसांपूर्वी क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज 28 तारखेला जाहीर दाखल करणार असल्याचे सांगितलं होतं. त्याचबरोबर आपली उमेदवारी अडीच वर्षांपूर्वी निश्चित होती असाही त्यांना दावा त्यांनी केला होता. मात्र आता पहिल्या यादीमध्ये त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याने हा मतदारसंघ भाजपकडे जातो की खासदार महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक शिंदे गटात प्रवेश करतात का? याची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. महाडिक यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मतदारसंघ भाजपला मिळाला, नाही तर शिंदे गटात प्रवेश करून कृष्णराज यांना उमेदवारी दिली जाणार का? याचीही उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या