Unseasonal rain : अवकाळी पावसामुळे दोन लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान, तात्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Unseasonal Rain News : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर त्यामध्ये 106 जनावरे दगावली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तात्काळ पंचनामे करावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई: दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं आहे. या दोन दिवसाच्या अवकाळी पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 106 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेल्या संकटांचं शुक्लकाष्ट काही संपायचं नाव घेईना. कधी दुष्काळाच्या संकटांचा डोंगर उभा राहतो, तर कधी वाटेत अवकाळीचा समुद्र आडवा येतो. शेता-वावरात कष्ट करत, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यांतून आता अश्रू ओघळू लागले आहेत.
कोणत्या तालुक्यात किती नुकसान?
- ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील 53 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे
- पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील 41 हेक्टर
नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर,चांदवड, येवला तालुक्यातील 32 हजार 833 हेक्टर क्षेत्रातील नुकसान
- धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपुर, शिंदखेडा तालुक्यातील 46 हेक्टर
- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील 2 हजार 239 हेक्टर
- जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगांव तालुक्यातील 552 हेक्टर
- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहता येथील 15 हजार 307 हेक्टर
- पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील 3 हजार 500 हेक्टर क्षेत्रातील
- सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील 15 हेक्टर
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील 4 हजार 200 हेक्टर
- जालना जिल्ह्यातील बदनापूर,जालना,जाफ्राबाद तालुक्यातील 5 हजार 279 हेक्टर
- बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील 215 हेक्टर
- हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील 100 हेक्टर
- परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील 1 हजार हेक्टर
- नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील 50 हेक्टर
- बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद., मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदूरा तालुक्यातील 33 हजार 951 हेक्टर
ही बातमी वाचा: