एक्स्प्लोर

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याचा आवाका मोठा! 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र, कारवाईचे आदेश

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे. यात 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे.  

Maharashtra TET Exam Scam : राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असू शकते.  2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या (Pune Cyber Police) तपासात उघड झालं होतं. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे.  

त्याचबरोबर त्यांना इथून पुढे शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7800  विद्यार्थ्यांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तशा सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. 

2019 ला 16 हजार 705 विद्यार्थ्यांनी टी ई टी परीक्षा दिली होती. त्यापैकी 7800 विद्यार्थी पैसै देऊन परीक्षा पास झाल्याच निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणार्‍या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. 

2019 प्रमाणेच 2018 साली घेण्यात आलेल्या टी ई टी परीक्षेत देखील गैरव्यवहार झाल्याच उघड झालं असून त्याचा तपासही पुणे सायबर पोलीस करत आहेत.  त्याचबरोबर 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

टी ई टी घोटाळ्यात पोलीसांनी शिक्षण परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव ढेरे याच्यासह टी ई टी परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी ए टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्यासह अनेकांन अटक केली आहे.  राज्यातील आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करताना पुणे सायबर पोलीसांना म्हाडा परीक्षेचा पेपर फुटल्याचं समजलं. तर म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टी ई टी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं होतं.  2018 सालच्या परीक्षेत देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात उमेदवार अपात्र ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Pune TET Exam : पुण्यातील TET Exam घोटाळा प्रकरणी दोषारोपपत्र दाखल ABP Majha

मोठी बातमी: टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश, 293 उमेदवारांवर होणार कारवाई

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Embed widget