एक्स्प्लोर

पावसाचा जोर वाढला, कोकणासह विदर्भात संततधार, वाहतुकीचे अनेक मार्ग बंद, नागरिकांना पुराचा अलर्ट, कुठे काय स्थिती? वाचा सर्व अपडेट्स

पावसाची रिपरिप वाढली, कोकणासह विदर्भात संततधार, वाहतूकीचे अनेक मार्ग बंद, पूर परिस्थितीने नागरिकांना अलर्ट, कुठे काय स्थिती? वाचा सर्व अपडेट्स

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. कोकणासह विदर्भ मराठवाड्यातही पावसाची झड कायम आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक धरणांमधून विसर्ग सुरू असून जलसाठ्यातही वाढ झाली आहे. विदर्भात पावसामुळे दाणादाण उडाली असून नदी नाले तुडुंब वाहत आहेत.  अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली असून आज बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचे अंदाज हवामान विभागाने दिले आहेत. राज्यभरात पावसाची कुठे काय परिस्थिती आहे? जाणून घेऊया ताजे अपडेट्स..

विदर्भात मुसळधार पावसाने दाणादाण

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात होणाऱ्या जोरदार पावसामुळे उतावली गावाजवळ चाकर्डा पाटियाकडे जाणारा मार्ग दोन तासांपासून बंद आहे.  भंडार्यातील आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. संततधार पावसामुळे शेतात पाणी साचायला सुरुवात झाली असून अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.वाशिम जिल्ह्यात रात्री पासून सर्वदूर पावसाची रिपरिप  सुरू असू  दुपारी 1 वाजे नंतर पावसाचा जोर वाढलाय सतत बरसत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील 3  मोठे धरण प्रकल्प  100 टक्के  तुडुंब भरले असल्याच चित्र आहे..असाच काही दिवस पाऊस बरसला तर जिल्ह्यातील इतर  धरण प्रकल्प  तुडुंब  भरण्याची शक्यता आहे..

अमरावती आणि गोंदियात पूरसदृश्य स्थिती

अमरावती शहरात रिमझिम पावसासोबतच ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील मेघा नदी दुथडी भरून वाहत असून परिसरातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पावसाचा जोर वाढला, कोकणासह विदर्भात संततधार, वाहतुकीचे अनेक मार्ग बंद,  नागरिकांना पुराचा अलर्ट, कुठे काय स्थिती? वाचा सर्व अपडेट्स

गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. शहरातील गणेशनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असून परिसर जलमय झाला आहे. नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तिरोडा महामार्गावरील अवंती चौकात चार फूट पाणी साचले असून लोक जीवघेणा प्रवास करत आहेत. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. भंडाऱ्यातील नदीनाले ओसंडून वाहत असल्याने जिल्ह्यातील आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. साकोली, लाखनी तालुक्यातील अनेक मार्गांवर पाणी साचल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते बंद केले आहेत.

मराठवाड्यात पावसाची संततधार

हिंगोली जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असला तरी सकाळपासून रिमझिम स्वरूपाचाच पाऊस पडत आहे. मागील आठ दिवसांपासून असाच पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी दुपारपासून पावसाची संततधार असून पावसाचा जोर वाढला आहे. धाराशिव, लातूर, परभणी, बीड जिल्ह्यातही सकाळपासून पावसाच्या सरी बरसतायत. काही ठिकाणी हलका पाऊस असला तरी बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

कोकण किनारपटटीसह मुंबई उपनगर व आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने मुंबईसह संपूर्ण कोकण विभागाला पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत. मध्य महाराष्ट्रा पुण्यासह सातारा घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघरला आज रेड अलर्ट आहे.  कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. सखल भागात पाणीच पाणी झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Embed widget