मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार पिता-पुत्र शरद पवारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग
अजित पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे ( MLA Babandada Shinde) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी आले आहेत.
Maharashtra Polticis News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे ( MLA Babandada Shinde) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी आले आहेत. पुण्यातील मोदी बाग इथं बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे पोहोचले आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार गटाचे आणखी एक आमदार शरद पवार गटात घरवापसी करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
आमदार बबनराव शिंदे शरद पवार गटात घरवापसी करणार का?
शरद पवार हे सध्या पुण्यातील मोदी बागेमध्ये आहेत. या ठिकाणी अनेकजण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. अशातच माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजिससिंह शिंदे शरद पवार यांना भेटण्यासाठी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळं अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. कारण आमदार बबनराव शिंदे शरद पवार गटात घरवापसी करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे माढा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू धनराज शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती. तर आमदार बबदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी रोहित पवार यांचे वडिल राजेद्र पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची तुतारी कोणाला मिळणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक
विधानसभा मिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार गटाकडून धनराज शिंदे, संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटे हे इच्छुक आहेत. तसेच अभिजित पाटील यांच्यासह मिनल साठे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. मात्र, अशातच आता बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं पुढे नेमकं काय होणार हा येणारा काळच ठरवेण.
महत्वाच्या बातम्या: