एक्स्प्लोर

Shivsena : शिवसेनेच्या आमदारांनंतर आता 'हे' खासदारही देणार उद्धव ठाकरेंना धक्का?

Maharashtra Politics Shivsena: शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात आहेत. शिवसेनेतील 11 खासदार एकनाथ शिंदे गटात सामिल होऊ शकतात.

Maharashtra Politics Shivsena:  शिवसेनेत सुरू असलेले बंडखोरीचे लोण आता खासदारांमध्ये पसरण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या 18 लोकसभेच्या खासदारांपैकी 11 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवाराला मतदान करावे अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. शिवसेनेकडून सध्या विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची शक्यता आहे. 

खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या या आधीच्या भूमिकेची आठवण करुन दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी याधी पक्षभेद न पाळता राज्याची कर्तृत्ववान महिला असलेल्या प्रतिभा पाटील यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावं यासाठी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्याशिवाय, प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा आदर करत त्यांनाही पाठिंबा दिला होता. आता हीच परंपरा कायम ठेवावी आणि आदिवासी समाजातील एका महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा केली आहे.  

मात्र, राहुल शेवाळे यांनी लिहिलेले पत्र हे निमित्त असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे विधानसभेतील 55 पैकी 40 आमदार हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर आता खासदारही आपल्या बाजूने वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. बहुसंख्य खासदारही शिंदे गटाकडे गेल्यास मूळ शिवसेनेचा ताबा कोणाकडे याबाबतही प्रश्न निर्माण होणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' मिळवण्यासाठीदेखील शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. 

>> शिंदे गटात कोणते खासदार असणार?

श्रीकांत शिंदे ( कल्याण )
राजन विचारे ( ठाणे )
राहुल शेवाळे ( दक्षिण मध्य मुंबई ) 
भावना गवळी ( यवतमाळ)
हेमंत गोडसे ( नाशिक ) 
कृपाल तुमाने ( रामकेट ) 
हेमंत पाटील ( हिंगोली )
प्रतापराव जाधव ( बुलढाणा ) 
सदशिव लोखंडे ( शिर्डी )
राजेंद्र गावित ( पालघर ) 
श्रीरंग बारणे ( मावळ ) 

>> उद्धव ठाकरे यांच्यासोबत आठ खासदार

विनायक राऊत ( रत्नागिरी ) 
अरविंद सावंत ( दक्षिण मुंबई )
गजानन किर्तीकर ( उत्तर-पश्चिम मुंबई )
धैर्यशील माने ( हातकणंगले ) 
संजय मंडलिक ( कोल्हापुर ) 
कला बेन डेलकर ( दादरा नगर हवेली ) 
संजय बंदू जाधव ( परभणी ) 
ओमराजे निंबाळकर ( उस्मानाबाद)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होताABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDhananjay Munde News : मी राजीनामा दिलेला नाही, विरोधकांच्या मागणीवर धनंजय मुंडे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडेंनी ठामपणे सगळंच सांगून टाकलं
धनंजय मुंडेंच्या देहबोलीतील कॉन्फिडन्स कायम, ठाम स्वरात म्हणाले, 'काहीही मंत्रि‍पदाचा राजीनामा वगैरे दिलेला नाही'
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Embed widget