एक्स्प्लोर

Ashish Shelar : मुंबई मेट्रोचे 'ऑपरेशन फेल'! मुंबईकरांचा जीव धोक्यात, शेलारांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Ashish Shelar : मेट्रोचे अजून 15 दिवस काम बाकी असूनही ठाकरे सरकारने याच्या उद्घाटनाचा घाट घातला.

Ashish Shelar : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A'या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ,  पालक मंत्री अस्लम शेख, आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधताना राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी टीका करत मुंबई मेट्रोचे पहिल्या दिवशीच ऑपरेशन फेल झाल्याचे सांगितले आहे. तसेच शेलारांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले आशिष शेलार?

मुंबई मेट्रोचे 'ऑपरेशन फेल'!
मुंबई मेट्रोचे पहिल्या दिवशीचे ऑपरेशन (गुढीपाडव्याच्या दिवशी दोन मार्गाचे उद्घाटन) अयशस्वी ठरले आहे. मेट्रो ट्रेन वाहतूक विलंब, कधी मेट्रो ट्रेनच रद्द, तर कधी सॉफ्टवेअर समस्या दिसून आल्या आहेत, योग्य तपास न करता मुंबई मेट्रो सुरू करण्यात आली आहे, या मेट्रोचे अजून 15 दिवस काम बाकी असूनही ठाकरे सरकारने याच्या उद्घाटनाचा घाट घातला. खोट्या पीआरसाठी मुंबईकरांचा जीव धोक्यात घालू नका. असे सांगत आशिष शेलारांनी ट्विटच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A'या मार्गाचे लोकापर्णाच्या दिवशी  मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा होता, ते म्हणाले, मुंबई मेट्रोसाठी कांजूरची ओसाड जमीन का दिली जात नाही, मुंबईच्या पम्पिंग स्टेशनसाठी जमिनीची मागणी करूनही ती जमीन दिली जात नाही. धारावीच्या विकासासाठी रेल्वेची जमीन दिली जात नाही. मुंबई वाढत आहे, बदलती मुंबई पाहिली आहे. नागरिकांना मुंबईत अनेक सुविधा दिल्या आहेत, काळानुसार शहर बदलत असताना आणखी किती सुविधा द्यायचा हा प्रश्न उभा राहतो. मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा फायदा राज्याला किती होईल असा प्रश्न उपस्थित करत मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर राज्याच्या विकासात हातभार लागला असता. मुंबई मेट्रोच्या कामाचे श्रेय सर्व मुंबईकरांना दिले पाहिजे. मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी, विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे महागाई, लोकांच्या प्रश्नावरील लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. 

इतकी घाई का केली? प्रवाशांकडून सवाल

उद्घाटनानंतर सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत नव्या मेट्रोची रखडपट्टी पाहायला मिळाली. मागाठाणे स्थानकात मेट्रो मध्येच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना त्या मेट्रोमधून उतरुन दुसऱ्या मेट्रोने प्रवास करण्यास सांगण्यात आलं. ओवरीपाडा स्टेशनवरही मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत करण्यात आले. उद्घाटनाच्या दिवशीही मेट्रो बंद पडली होती. तसंच कालही बिघाड झाल्याने मेट्रोचे दरवाजे उघडत नव्हते. सलग तिसऱ्या दिवशी नव्या मेट्रोमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे मुंबईकरांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरही प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात. एमएमआरडीएने इतकी घाई का केली असे सवाल प्रवाशांकडून विचारले जातायत..

संबंधित बातम्या

CM Uddhav Thackeray : मुंबई मेट्रो कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

सुख म्हणजे काय असतं, अजित दादांनी सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi  On Marathi Sahitya Sammelan  : 98 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्तेMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचंं खातेवाटप जाहीर, कुणाकडं कोणतं खातं? पाहा लिस्ट!Sunil Pal Majha Katta : अपहरणातून मी सुटलो, आता शक्ती कपूर टार्गेट, सुनील पालचे थरारक किस्सेGautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
Embed widget