एक्स्प्लोर

भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले असून अपेक्षेप्रमाणे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिले आहे. तर, अर्थ व वित्त आणि नियोजन विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली असून गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती देण्यात आली आहेत. राज्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेल्या आणि मंत्रिपदासाठी गत महायुती सरकारपासून इच्छुक असलेल्या मंत्र्यांनाही महत्त्वाचे खातेवाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार, शिवसेनेच्या मंत्री भरत गोगावले, संजय शिरसाट, संजय राठोड तर भाजपमध्ये नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही खातेवाटप जाहीर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नरहरी झिरवाळ यांनाही वजनदार खातं मिळालं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.  हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप (Khatevatap) जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. अखेर आज सर्व मत्र्यांना त्यांची खाती मिळाली आहेत. 

नितेश राणेंसह चर्चेतील 5 मंत्र्यांचे खातेवाटप

भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

संजय शिरासाट - सामाजिक न्याय

संजय राठोड - मृदू व जलसंधारण

नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 

शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

राज्यातील संपूर्ण खातेवाटपाची यादी


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

मंत्रिमंडळ

कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा  (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 
7.गणेश नाईक -  वन
8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9.संजय राठोड - मृदा व जलसंधारण 
10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल - विपणन, राजशिष्टाचार 
14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन 
15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा 
16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 
19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 
21.शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
22.माणिकराव कोकाटे - कृषी 
23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे - टेक्स्टाईल 
26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 
27.प्रताप सरनाईक - वाहतूक 
28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन, मिठागरे विकास 
29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 
31.आकाश फुंडकर - कामगार 
32.बाबासाहेब पाटील - सहकार 
33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री  (State Ministers )


34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 
35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 
38. योगेश कदम  - गृहराज्य शहर
39. पंकज भोयर - गृहनिर्माण,गृहराज्य ग्रामीण

हेही वाचा

खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Embed widget