एक्स्प्लोर

Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?

मतदारसंघातील कार्यक्रमात बोलताना, साहेब मंत्रीपद पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होत. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांनाच टोमणा हाणला.

पुणे : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आज सर्वच आमदार, मंत्री आपल्या मतदारसंघात पोहोचले आहेत. मंत्र्‍यांचे त्यांच्या मतदारसंघात व जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात स्वागत होत असून आमदारांचाही नागरी सत्कार व सन्मान केला जात आहे. मात्र, ज्या आमदारांना व बड्या नेत्यांना मंत्रि‍पदाला हुलकावणी दिली, त्या नेत्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या राज्य सरकारमध्ये यंदा मुख्यमंत्र्‍यांसह एकूण 42 मंत्र्‍याचा शपथविधी पार पडला असून 39 मंत्र्‍यांनी नागपुरात शपथ घेतली. त्यानंतर, ते पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात पोहोचत आहेत. मात्र, अनेक दिग्गजांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नेते व कार्यकर्ते दोघेही नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) छगन भुजबळ यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र, माजी गृहमंत्री राहिलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walase patil) यांनी मंत्रि‍पदावर भाष्य करणाऱ्या कार्यकर्त्याचेच कान टोचले आहेत. 

मतदारसंघातील कार्यक्रमात बोलताना, साहेब मंत्रीपद पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होत. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांनाच टोमणा हाणला. विधानसभेला 1500 मतांनी विजयी झालोय, म्हणून मला मंत्रीपद द्या, अशी मागणी पक्षाध्यक्षांकडे करायची का? असा खोचक टोमणा वळसे पाटलांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांला लगावला. आंबेगाव विधानसभेतून वळसेंना शरद पवार गटाचे देवदत्त निकमांनी कडवी झुंज दिली. या निसटत्या विजयानंतर वळसेंनी आज आभार मेळावा आयोजित केला होता. दरम्यानच्या काळात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वळसेंची वर्णी लागली नाही. त्यामुळे या आभार मेळाव्यात एका अतिउत्साही कार्यकर्त्याने साहेब आपल्याला मंत्रीपद हवं, असा आग्रह धरला. तेंव्हा वळसेंनी सरसकट सर्वांना चिमटा काढला. त्यामुळे, दिलीप वळसे पाटील हेही मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नसल्याचे दिसून आले. 

दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून सर्वच मंत्र्यांना आता कार्यभार देण्यात आला आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले असून अपेक्षेप्रमाणे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिले आहे. तर, अर्थ व वित्त आणि नियोजन विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली असून गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती देण्यात आली आहेत. राज्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेल्या आणि मंत्रिपदासाठी गत महायुती सरकारपासून इच्छुक असलेल्या मंत्र्यांनाही महत्त्वाचे खातेवाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार, शिवसेनेच्या मंत्री भरत गोगावले, संजय शिरसाट, संजय राठोड तर भाजपमध्ये नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही खातेवाटप जाहीर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नरहरी झिरवाळ यांनाही वजनदार खातं मिळालं आहे.

हेही वाचा

भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं,  बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
Embed widget