एक्स्प्लोर

फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच

फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

Sanjivraje Naik Nimbalkar : रामराजे निंबाळकर यांचे धाकटे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आज (14 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवारांना साथ देणार आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील शरद पवारांच्या उपस्थितीत फलटणमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता हा पक्ष प्रवेश पार पडेल. रामराजे देखील आमच्याच बाजूने असल्याचा पुनरुच्चार संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. फलटणमधील अनंत मंगल कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. 

फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सातारमध्ये अजित पवार गटाला तगडा झटका बसला आहे. 

रामराजे निंबाळकर कोणती भूमिका घेणार? 

दरम्यान, आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार ते करणार नाहीत. गेले अनेक दिवस रामराजे व आमदार दीपक चव्हाण हे खासदार शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आपण संजीवराजेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे रामराजे यांनी स्पष्ट केले आहे. रामराजे हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचा आणखी कार्यकाळ बाकी आहे. तांत्रिक अडचण असल्याने ते तूर्त प्रवेश करणार नाहीत. 

दीपक चव्हाणांना फोनवरून उमेदवारी 

दुसरीकडे, तुतारी फुंकत असलेल्या आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवारा यांनी फोनवरुन जाहीर केली होती. दीपक चव्हाण फलटण मतदारसंघातून तीनवेळा आमदार झाले आहेत. आता ते चौथ्यावेळी विधानसभेच्या रिंगणात असतील. फलटण मतदारसंघात यावेळी ते विजयी झाल्यास सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद होईल. कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेगळा निर्णय घेतल्यास सातारा जिल्ह्याचं राजकारण बदलणार आहे. 

शिवस्वराज्य यात्रा आजपासून पश्चिम महाराष्ट्रात

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आजपासून (14 ऑक्टोबर) बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. यात्रेचा हा शेवटचा टप्पा असेल. या यात्रेची सांगता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या मतदारसंघांमध्ये होणार आहे. सांगता सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, उद्या (15 ऑक्टोबर) विधानसभेसाठी बिगुल फुंकले जाण्याची शक्यता आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 14, 15 आणि 16 तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Embed widget