एक्स्प्लोर

Grampanchayat Election 2023 :  ग्रामपंचायत निवडणूक निकालात उलटफेर; दिग्गज नेते, आमदारांना धक्के, ग्रामपंचायती गमावल्या

Grampanchayat Election 2023 : प्रस्थापित, दिग्गज नेते, आमदारांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या नेतृत्वातील, समर्थन असलेल्या पॅनलला ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.

Grampanchayat Election 2023 :  राज्यातील 2359 ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे काही नेत्यांच्या पॅनलला विजय मिळाला. तर, काही ठिकाणी उलटफेर झाला आहे. प्रस्थापित, दिग्गज नेते, आमदारांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या नेतृत्वातील, समर्थन असलेल्या पॅनलला ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गाव असलेल्या धापेवाडा ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला धक्का बसला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या फेरमतमोजणीत काँग्रेसच्या मंगला शेट्टे या विजयी झाल्या आहेत. सरपंच मंगला शेट्टे या 112 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या निशा खडसे यांचा पराभव केला. सदस्यमध्ये  17 पैकी 10 सदस्य काँग्रेसचे, सहा सदस्य भाजपचे आणि एक अपक्ष निवडून आले. 

बुलढाण्यात भाजप आमदार संजय कुटे यांना धक्का

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 48 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून जिल्ह्यात हे निकाल समिश्र स्वरूपाचे आहेत जिल्ह्यात महायुतीला 23 ग्रामपंचायती महाविकास आघाडीला 14 ग्रामपंचायत तर स्थानिक आघाड्यांना 11 ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे. जिल्ह्यात सर्वात चर्चेत ग्रामपंचायतची निवडणूक होती ती जळगाव जामोद तालुक्यातील जामोद ग्रामपंचायतची. ही ग्रामपंचायत याआधी भाजपच्या ताब्यात होती. मात्र या ठिकाणी उलटफेर झाला व 17 पैकी 15 जागा जिंकत काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे. ही ग्रामपंचायतची निवडणूक डॉ. संजय कुटे यांनी मोठ्या प्रतिष्ठेची केली होती. जळगाव जामोद तालुक्यात एकूण तीन ग्रामपंचायती च्या निवडणुका होत्या त्यापैकी दोन ग्रामपंचायत या काँग्रेसने जिंकल्या आहेत तर एक ग्रामपंचायती स्थानिक आघाडीने जिंकली आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचाही दबदबा राहिला आहे बुलढाणा व मेहकर तालुक्यात शिंदे गटाने अनेक ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला आहे तर जिल्ह्यात काँग्रेसनेही मोठी आघाडी घेतली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात एकनाथ खडसेंना धक्का

मुक्ताईनगर तालुक्यातील चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.  मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या मंदाकिनी कोळी, वडवे ग्रामपंचायतवर शिंदे गटाचे शिवराम कोळी, चिखली ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वैभव पाटील सरपंच पदी विराजमान झाले असून पिंपरी नांदू - ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसे समर्थक प्रतिभा अशोक पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहेत.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात शिंदे गटाचा पराभव

ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मतदार संघातील एक ही ग्रामपंचायत शिंदे गटाकडे नाही. त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतपैकी एकावर भाजप तर दोन ग्राम विकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर वेंगुर्ले तालुक्यात चार पैकी तीन भाजपकडे तर एक ठाकरे गटाकडे आहे. सावंतवाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळा सुद्धा फोडता आला नाही.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांना मूळ गावात पराभवाचा धक्का

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कवाडे ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीएम) लाल बावटा फडकला आहे.  शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. श्रीनिवास वनगा यांचे मूळ गाव असलेल्या कवाडे ग्रामपंचायतमध्ये सीपीएमचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला आहे. कवाडे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात सीपीएमचे आमदार विनोद निकोले यांना यश आले आहे. कवाडे ग्रामपंचायतमध्ये माकपाच्या दर्शना बोधले 191 मतांनी विजयी झाल्या.  

सांगोल्यात शेकापची सरशी, शहाजी बापूंचा एका ग्रामपंचायतीवर विजय

सांगोला तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू यांना धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाने तीन ग्रामपंचायतीवर विजय मिळवला.  सांगोला खवासपुर, सावे ग्रामपंचायत , वाडेगाव ग्रामपंचायतीवर शेकापने विजय मिळवला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाहीSaleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुखDevendra Fadnavis on Chandiwal : मविआ काळातील भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे समोर आले - फडणवीसTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Laxman Hake: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके
ओबीसी समाज लोकसभेचा बदला घेणार, विधानसभेला तुतारीचे सर्व उमेदवार आडवे करणार: लक्ष्मण हाके
Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
Embed widget