चंद्रकांत दादांचे गणित कच्चे! भाजप खोटी आकडेवारी देणारा पक्ष : अब्दुल सत्तार
चंद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्रात भाजपा नंबर एक असल्याचा दावा सत्तार यांनी खोडून काढला आहे.
![चंद्रकांत दादांचे गणित कच्चे! भाजप खोटी आकडेवारी देणारा पक्ष : अब्दुल सत्तार Gram Panchayat election Chandrakant Dada's maths crude, BJP giving false statistics Minister Abdul Sattar to BJP चंद्रकांत दादांचे गणित कच्चे! भाजप खोटी आकडेवारी देणारा पक्ष : अब्दुल सत्तार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/23215201/WhatsApp-Image-2021-01-23-at-4.21.42-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
धुळे : महाराष्ट्रच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा शेवटून एक नंबर आहे. चंद्रकांत दादांचे गणित कच्चे असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे. भाजप खोटी आकडेवारी देणारी पार्टी झाली असून ती जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच महाराष्ट्रात झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनाच एक नंबर असल्याचा दावा राज्याचे ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
आमच्याकडे परिपूर्ण आकडेवारी असून आकडेवारीच्या मुद्द्यावरून भाजपाच्या नेत्यांना समोरासमोर येण्याचे आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. चंद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्रात भाजपा नंबर एक असल्याचा दावा सत्तार यांनी खोडून काढला आहे. धुळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
आज धुळे दौऱ्यावर पालकमंत्री अब्दुल सत्तार आल्यानंतर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जुन्या महापालिकेजवळ शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धुळे जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
Gram Panchayat Election 2021 | 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत आमचाच विजय; भाजपचा दावा
Gram Panchayat Election Results 2021 | लय भारी! खांद्यावरून मिरवणूक काढत, पत्नीकडून पतीचा विजयोत्सव साजरा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)