एक्स्प्लोर

1826 पानांचे पुरावे देऊनही अब्दुल सत्तारांवर कारवाई होईना, तक्रारदराने थेट ईडी कार्यालयासमोरच कापला केक

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला आहे.

मुंबई : मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या विरोधात दोन वर्षात तीनदा तब्बल 1826 पानांचे पुरावे देऊन तक्रारी दाखल केल्या. मात्र, तरीही ईडी (ED) कार्यालयाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने तक्रारदराने चक्क ईडी कार्यालयासमोरच दोन वर्षाचा केक कापत 'तक्रार दिन' साजरा केला आहे. तसेच, आत्ताही कारवाई न झाल्यास आता थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा तक्रारदराने दिला आहे. महेश शंकरपल्ली (Mahesh Shankarpalli) असे तक्रारदर यांचे नाव असून, ते सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते आहेत. 

मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले आहेत. त्यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या असून, मोठे घोटाळे देखील केले असल्याचा आरोप सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. सोबतच त्यांनी आपल्याकडे सत्तार यांच्या कारनाम्याचे  पुरावे असल्याचे देखील म्हणाले होते. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शंकरपल्ली यांनी पहिल्यांदा 31 डिसेंबर 2021 रोजी 784 पानाची तक्रार ईडी कार्यालयात दाखल केली होती. मात्र, कोणतेही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा 01 जानेवारी 2023 रोजी 569 पानाची तक्रार ईडी कार्यालयात दिली. मात्र, तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महेश शंकरपल्ली यांनी ईडी कार्यालयात 473 पानाची तक्रार दिली आहे. तसेच, पुढील एका महिन्यात ईडीने तक्रारीची दखल न घेतल्यास आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे महेश शंकरपल्ली यांनी म्हटले आहे. 

केक कापून तक्रार दिन साजरा केला...

महेश शंकरपल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. सत्तार यांनी आपल्या पदाचा वापर करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे सत्तार यांच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी त्यांनी ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तसेच, तेव्हापासून आतापर्यंत तीनदा महेश शंकरपल्ली यांनी एकूण 1826 पानांचे पुरावे जोडत सत्तार यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली आहे. मात्र, तरीही कारवाई होत नसल्याने ईडी विरोधात हटके आंदोलन करत महेश शंकरपल्ली यांनी आज ईडी कार्यालयाच्या समोर केक कापत तक्रार दिन साजरा केला आहे. सोबतच महिन्याभरात कारवाई न झाल्यास थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी दिला आहे. 

संबंधित बातमी: 

अब्दुल सत्तारांचा पीए आणि समर्थकांकडून सिल्लोडमध्ये सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024Shivaji Park Thackeray Sabha : 10 तारखेला शिवाजीपार्क मैदानावरील सभेसाठी परवानगी मिळणार? ठाकरे बंधूत रस्सीखेचEknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
Embed widget