एक्स्प्लोर

रोहित पवारांची आज ईडी चौकशी; बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती, शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन

बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशीशरद पवार गट शक्तिप्रदर्शन करणार, तर चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar ED Inquiry : मुंबई : आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची आज ईडी (ED) चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. दरम्यान, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. त्याशिवाय कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. तसेच, मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बारामती अॅग्रोवर ईडीकडून छापेमारी 

बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी कोली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. आता ईडीनं पुन्हा आपला मोर्चा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोकडे वळवला आहे. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा 

सध्याचा आठवडा चौकशांचा आठवडा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोमवारपासून सुरु झालेल्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीने चौकशीसाठी बोलावलेलं. कथित बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी ठाकरे गटाचे आमदार रवींग्र वायकर यांनाही 11 वाजता ईडीनं चौकशीसाठी समन्स धाडलं आहे. जोगेश्वरीतील भूखंडप्रकरणी वायकरांची चौकशी सुरू आहे. तर आज म्हणजेच, बुधवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. बारामती अॅग्रोप्रकरणी ही चौकशी होणार आहे. तर, गुरुवारी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं चौकशीसाठी पाचारण केलं आहे. कोरोना काळातील कथित बॉडीबॅग प्रकरणी ही चौकशी होणार आहे. त्यामुळे या आठवड्याच्या चार दिवसांत विरोधकांच्या चार नेत्यांच्या होणाऱ्या चौकशांची राज्याच्या राजकीय तसंच सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget