एक्स्प्लोर

Maharashtra BJP : लोकसभेसाठी भाजपची विशेष रणनीती, फेब्रुवारीपासून देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा धडाका, दररोज तीन सभा घेणार

Devendra Fadanvis : येत्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. 

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे.  त्याअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत. फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असून ते फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार आहेत. लवकरच या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर होईल. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश नंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. 

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने फेब्रुवारीपासून राज्याच प्रचाराचा धडाका लावण्याचं निश्चित केलं आहे. राज्यातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य पिंजून काढणार आहेत. 

सर्व्हे काहीही असो, आम्ही 40 च्या वर जाणार म्हणजे जाणारच 

सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला फायदा होणार असून महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो, पण कोणताही सर्व्हे असो फक्त मोदींचीच हवा असणार आहे, जनतेने ठरवलं आहे मोदींनाच निवडून द्यायचं. त्यामुळे आम्ही 40 च्या वरती जाणार म्हणजे जाणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर अशा प्रकारच्या सर्व्हेला कोणताही आधार नसतो, पाच राज्यांचे सर्व्हे आठवा आणि निकालही आठवा अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

काय सांगतोय सी व्होटर सर्व्हे? 

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा असून जनमत चाचणीत महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली असती तर पोलनुसार भाजप महायुतीला+ 19-21 जागा मिळाल्या असत्या, तर महाविकास आघाडीला + 26-28 जागा मिळाल्या असत्या. इतरांना 0-2 जागा मिळाल्या असत्या. मतांच्या टक्केवारीनुसार, भाजपला + 37 टक्के, काँग्रेसला+ 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील.

कोणाला किती जागा?
स्रोत- सी व्होटर 

  • लोकसभेच्या जागा - 48
  • भाजप+ 19-21
  • काँग्रेस + 26-28
  • इतर- 0-2

महाराष्ट्रात कोणाला किती मते? 
स्रोत- सी व्होटर 

  • लोकसभेच्या जागाा- 48
  • भाजप+ 37 टक्के
  • काँग्रेस + 41 टक्के
  • इतर - 22 टक्के

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget