एक्स्प्लोर

राज्यातील भाटघर, उजनीसह 'ही' धरणे झाली 100% फुल्ल! कोणत्या विभागात काय स्थिती? 

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांपैकी असणारी पाच धरणे 100% भरली असून यंदा हजारो गावांची तहान भागणार आहे.

Dam Water Storage Update: राज्यात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली असून  पावसाच्या पाण्याने धरणे तुडुंब होत आहेत. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रमुख धरणांपैकी असणारी पाच धरणे 100% भरली असून यंदा हजारो गावांची तहान भागणार आहे. राज्यात झालेल्या पावसामुळे (Rain) नदी नाले ओसंडून वाहत असून बंधाऱ्यांमधून नदीपात्रांमध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शेती व सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याने दिलासा देणारं चित्र आहे. 

भाटघर, वीर आणि उजनी धरण फुल्ल! 

पुणे विभागातील बहुतांश धरणे आता भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण 100% ने भरले आहे. निरा देवघर धरणात 97.20%, चाकसमान 99.02%, पवना 95.27%, खडकवासला 81.43%, पानशेत 99.13%, डिंभे 83.79 टक्क्यांनी भरले आहे.  सध्या या सर्व धरणांमधून विसर्ग सुरू असून मुळा,मुठा, भीमा, मीरा नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे. 

सातारा, सांगली, कोल्हापूर मधील धरणांची ही स्थिती सध्या चांगली असून बहुतांश धरणे 80 टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. कोल्हापूरचा दूधगंगा प्रकल्प 85.95 टक्क्यांनी तर राधानगरी 97.82 टक्के भरला आहे. 

राज्यातील ही पाच धरणे 100% 

सोलापूर जिल्ह्यातील उजनी, साताऱ्यातील वीर, पुण्यातील भाटघर व आंद्रा, गोंदिया मधील इटियाडोह ही पाच धरणे 100 टक्क्यांनी भरली आहेत. पुणे नाशिक विभागातील बहुतांश धरणांमध्ये चांगला पाणी साठा शिल्लक आहे. कोकणातील धरण साठा 90 च्या पुढे गेला असून मराठवाडा, अमरावती व नागपूर विभागात पाणी पातळीत वाढ होत आहे. 

कोणत्या धरणांमध्ये कसाय पाणीसाठा? 

जलसंपदा विभागाने सादर केलेल्या राज्यातील महत्त्वाच्या धरण साठ्यांमधील  पाण्याच्या अहवालानुसार कोकणातील बहुतांश धरणे आता भरली असून 90% च्या पुढे उपयुक्त पाणीसाठा आहे. ठाण्यातील भातसा 92.53% तर सूर्या धामणी धरण प्रकल्पात 94.93% पाणी आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील मोठ्या व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा आता वाढला असून 80%च्या पुढे उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. यात दारणा 92.96%, गंगापूर 88.97, गिरणा 36.96, तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा 95.28%, मुळा 72.14%, निळवंडे 83.12% भरले आहे.

राज्यातील विभागनिहाय धरणसाठा

राज्यात झालेल्या जोरदार पावसानंतर आणि धरणविसर्गानंतर राज्याचा उपयुक्त सरासरी पाणीसाठा 67.87 % आहे. यात नागपूरच्या एकूण ३८३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.७१ टक्के, अमरावतीच्या २६४ धरणांमध्ये ६३.५६, मराठवाड्यातील ९२० एकूण धरणांमध्ये २६.७० टक्के पाणीसाठा राहिलाय. नाशिकच्या सर्व धरणांमध्ये ६१.८९ टक्के, पुण्यातील ७२० धरणांमध्ये ८३.३१ टक्के तर कोकणातील १७३ धरणे ८९.४२ टक्के भरली आहेत.

हेही वाचा:

Raigad News : सैनिकांचे गावच असुरक्षित, गावातील पुल मोजतोय अखेरची घटका; सैनिकांच्या गावाला न्याय कधी मिळणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 13 March 2025JOB Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025 7 PmSatish Bhosale Khokya News | सहा दिवस खोक्या होता कुठे? खोक्याला बेड्या कश्या ठोकल्या? ते खोक्याच्या घरावरील कारवाई; संपूर्ण व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Embed widget