(Source: Poll of Polls)
Shiv Jayanti 2022 : जय भवानी घोषणेचे उद्गाते डॉ. बाबासाहेब आंबेडकरच, पुरावे दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे, असे डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.
Shiv Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटो ट्वीट करत म्हटलं आहे की, 'जय भवानी' ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना 'जय भवानी' असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज,महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 19, 2022
"जय भवानी" ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.
१/३ pic.twitter.com/xw3mugLF1s
महाड सत्याग्रहाच्यावेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती, असे देखील प्रकाश आंबेडकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
संबंधित बातम्या :