Bacchu Kadu : जे बोलतो ते पत्थर की लकीर, महाशक्ती संपूर्ण 288 जागा लढवणार अन् मुख्यमंत्रीही आमचाच; बच्चू कडूंचा दावा
Bacchu Kadu : आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारकडे 18 मागण्या केल्या होत्या. पण त्यातली एकही मागणी पूर्ण केली नाही. ही एकप्रकारे सरकारची मग्रुरी आहे. अशी घणाघाती टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
Maharashtra Politics अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhasabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. त्या अनुषंगाने जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, दौरे, संवाद सुरु केलाय. तसेच अनेक नवख्या उमेदवारांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. दरम्यान, प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे झालेल्या सभेनंतर वेगळा पवित्रा घेत महाशक्ती म्हणून आगामी निवडणुकांना समोर जाण्याचे ठरविले आहे. शिवाय आम्ही राज्यात संपूर्ण 288 जागा लढवणार असून मुख्यमंत्रीही आमच्याच महाशक्तीचा असेल, असे दावाही आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. ते अमरावती येथे बोलत होते.
26 सप्टेंबरपर्यंत वाट पाहू, त्यानंतर....
आम्ही छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मध्ये सरकारकडे 18 मागण्या केल्या होत्या. पण त्यातली एकही मागणी पूर्ण केली नाही. ही एकप्रकारे सरकारची मग्रुरी आहे. अखेर आम्ही दगड ठेऊन ही महाशक्ती उभी केली आहे. किंबहुना आम्ही जे बोलतो ते पत्थर की लकीर आहे. हा सगळा आमचा रोष सरकारवर असल्याचे बच्चू कडू म्हणाले. तर दुसरीकडे जरांगे पाटील हे महाशक्ती मध्ये येणार का? असा प्रश्न बच्चू कडूंना विचारला असता यावर बच्चू कडू म्हणाले की, आम्ही 26 सप्टेंबरपर्यंत वाट पाहू. त्यानंतर जे येतील त्यांचं स्वागत करू, असेही ते म्हणाले.
महाशक्ती म्हणून आम्ही संपूर्ण 288 जागा लढवणार- बच्चू कडू
आम्ही राज्याला चांगला पर्याय दिला पाहिजे म्हणून आम्ही तिसरा पर्याय दिलाय. देशात दिल्ली, पंजाब, बिहार याठिकाणी तिसरा पर्याय लोकांनी निवडून दिलाय. त्याचं प्रमाणे राज्यातही आम्हालाही लोक साथ देत निवडून देतील असा विश्वासही आमदार बच्चू कडूंनी बोलून दाखवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महाशक्ती म्हणून संपूर्ण 288 जागा लढवणार आहोत. झेंडे दाखवून निवडणूक लढवणे आता बंद होईल. तसेच हा निर्णय घेत असताना आणि महाशक्ती स्थापन करण्याआधी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. फक्त अजित पवार सोबत माझी भेट झाली नसल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा