राजानं प्रखर टीका सहन करावी, विश्वगुरु व्हायचं, तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा; नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी
मला मत द्या नाहीतर देऊ नका, मी सगळ्यांची काम करणार आहे. मी मतदान देणार त्यांचं पण काम करणार जे नाही देणार त्यांचा पण काम करणार नाही , असेही नितीन गडकरी म्हणाले.
नागपूर : लोकशाहीत (Lokshahi) सर्वोच्च पदावरच्याने प्रखर टीका सहन करावी असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलंय. राजाविरूद्ध कितीही बोललं तरी ते राजाने सहन करावं असं गडकरी म्हणाले. राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावं, टीका सहन करणं ही राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असं गडकरी म्हणाले. साहित्यिक,विचारवंतांनीही परखडपणे विचार मांडावे असं गडकरी म्हणाले. विश्वगुरु व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असाही सल्ला गडकरींनी दिला आहे.
नितीन गडकरी म्हणाले, आपल्या लोकशाहीमध्ये साहित्यिकांबद्दल,कवीबद्दल,विचारवंतांकडून तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपले विचार परखड पणे मांडले पाहिजेत. लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा कोणती असेल तर राजाच्या विरोधात कितीही कोणीही परखडपणे विचार मांडले तरी ते राजाने सहन केले पाहिजे आणि त्या विचारावर चिंतन केले पाहिजे हीच खरी लोकशाही मधील अपेक्षा असते.आई मला नेहमी सांगायची लहानपणी निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याला दिशा देणारा माणूस जो आहे तो आपल्याला सांगणार आहे आपले काय चुकलं काय बरोबर आहे.
महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. प्रत्येक व्यक्तीकडून जे चांगला आहे ते आपण घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की, त्यांनी अनेक वेळा विजय मिळवल्यानंतर कधीही परधर्मीयांची पूजा, मंदिर उद्ध्वस्त केली नाहीत. विरोधी असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला त्यांना घरी पाठवलं. एका अर्थाने त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला. सर्वधर्मसमभावाच जुन्या इतिहासातील सगळ्यात चांगलं उदाहरण कुठल असेल छत्रपती शिवाजी महाराज आहे याचा मला विश्वास आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
मत दिले नाही तरी मी काम करणार : नितीन गडकरी
सध्या महाराष्ट्रात बरच जातीपातीचे राजकारण सुरू आहे, मी कधीही जात-पात पाळत नाही. मी 50 हजार लोकांसमोर सांगितलं, मी जात-पात पाळणार नाही,मी जातीपातीचे राजकारण करणार नाही. जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ, जिसको देना वोट दो, जिसको नही देना मत दो. मला मत द्या देऊ नका मी सगळ्यांची काम करणार आहे. मी मतदान देणार त्यांचं पण काम करणार जे नाही देणार त्यांचा पण काम करणार , असेही गडकरी म्हणाले.
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर रोखठोक भाष्य करत जनतेने अशा लोकांना मतदान करू नये असे वक्तव्य केले. गडकरी म्हणाले, घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्या दिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही.. तेव्हा ते लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. मात्र त्याने स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे असे गडकरी म्हणाले.