एक्स्प्लोर

Jayant Patil : दसऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूने गाठल्यानंतर आता दिवाळीला जयंत पाटील सुद्धा डेंग्यूग्रस्त!

डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन, अशी माहिती ट्विट करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील डेंग्यू झाल्याची माहिती ट्विट करून देताना रिपोर्ट पोस्ट केला आहे. त्यामुळे भर दिवाळीत जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, दसऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणावरून राज्यात रान पेटले असतानाच डेंग्यूग्रस्त झाल्याने त्यांना विश्रांती घ्यावी लागली होती. डेंग्यू बरा झाल्यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. 

जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन.

शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

दुसरीकडे, डेंग्यूपासून दिलासा मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवा यांनी काका शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. शहा आणि अजित यांच्या भेटीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते. अजित पवार शरद पवार यांना एकटे भेटले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेट दिवाळीच्या सेलिब्रेशनबाबत होती. मात्र, अजितच्या एक दिवस आधी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. यावर सुप्रिया यांनी कोणतेही उत्तर दिलेलं नव्हतं. 

अजित पवार गट अस्वस्थ; निधी मिळत नसल्याचा आरोप

दुसरीकडे, अजित पवार राष्ट्रवादीला सुरुंग लावून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर सर्वकाही आलबेल असल्याची वक्तव्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच आमदार करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अनेक बैठका आणि कार्यक्रमांना असलेली अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय आहे. याचबाबत राजकीय वर्तुळात अजित पवार गट सध्या नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.  येत्या 21 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. नियमित दर मंगळवार आठवडा आमदार बैठक होणार आहे. मागील तीन आठवडे अजित पवार मात्र या बैठकीस उपस्थितीत नव्हते. अजित पवार गटात विकास निधी वाटपावरुन नाराजीचा सूर आहे. यावरच या बैठकीत चर्चा होणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांच्या देवगिरी बंगला येथे 21 तारखेला मंगळवारी बैठक पार पडणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 04 Oct 2024ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
Embed widget