एक्स्प्लोर

Raj Thackeray : हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे?  घाटकोपरमधील बॅनरमुळे चर्चेला उधाण...

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या आहेत. मनसेचे कार्यकर्ते देखील अॅक्टीव्ह झाले आहेत. घाटकोपरमधील मनसेच्या एका बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Raj Thackeray : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदुहृदयसम्राट असे म्हणत. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळे आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे. आज घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भले मोठे बॅनर लावले आहेत. त्यावर राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असे लिहले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या लावलेल्या त्या बॅनरची सध्या चर्चा होत आहे.
 
घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट लावण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. अशातच आता मनसेने हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यातच थेट राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे हिंदुहृद्यसम्राट म्हटल्याने या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे. तसेच या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी महानगर पालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, आता राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे लवकरच पालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते सध्या दौरे करताना दिसत आहेत. अशातच मुंबई महापालिकेची निवडणूक देखील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकांसाठी मनसेने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे देखील अॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रणPratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
Embed widget