एक्स्प्लोर
Advertisement
अखेर कर्जमाफीला मुहूर्त, 18 ऑक्टोबरपासून थेट खात्यात पैसे : सूत्र
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 18 ऑक्टोबरला कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : येत्या 18 ऑक्टोबरपासून कर्जमाफीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पहिल्या टप्प्यात ज्यांच्या खात्यावर समस्या नाही, अशा काही लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी ऑक्टोबर संपण्याच्या आत दिली जाणार आहे.
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 18 ऑक्टोबरला कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना
राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाते. या योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे. दिनांक 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
‘यांना’ कर्जमाफीतून वगळलं!
राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे तसेच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत. करदाते आणि व्हॅट भरणारे व्यापाऱ्यांनाही कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
नागपूर
Advertisement