अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये फेटा बांधला
धनंजय मुंडे निवडून येत नाहीत तोपर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही, असा निश्चय करणाऱ्या खासदार धनंजय मुंडे यांनी अखेर फेटा बांधला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: कोल्हे यांना फेटा बांधला आहे.

बीड : विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे परळीमधून निवडून येतील त्याचवेळी फेटा बांधेन, असा निश्चय राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. त्यानंतर अखेर परळीमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या निमित्ताने आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून फेटा आपल्या डोक्यावर बांधून घेतला.
बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही, असा पण अमोल कोल्हे यांनी केला होता. परळीकर जेव्हा धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन, असं खासदार अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अंबाजोगाईमध्ये झालेल्या शिवस्वराज्य यात्रेत निर्धार केला होता. आज धनंजय मुंडे विधानसभा निवडणूक जिंकून कॅबिनेट मंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांच्याच हस्ते अमोल कोल्हे यांनी फेटा बांधून घेतला.
निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने मी परळीत आलो होतो. त्यावेळी म्हटलं होतं की, धनंजय मुंडे आमदार होत नाहीत, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. माझ्या या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद देत मला पुन्हा एकदा फेटा बांधण्याचा बहुमान दिला. धनंजय मुंडे यांच्या रुपाने तुम्ही एक कर्तबगार मंत्री निवडून दिलात. त्यांच्या कर्तबगारीवर आम्हालाही अभिमान वाटतो, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मागील दोन कार्यक्रमात तुमच्याशी संवाद साधण्याची संधी हुकली. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुन्हा एकदा आठवण करून देत परळीकरांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दोन वर्षाच्या आत परळी 100 टक्के प्रदूषण मुक्त करणार आहोत. पाण्यासाठी थोडासा वेळ द्या, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
Amol Kolhe | ...तोपर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही, खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार
संबंधित बातम्या
























