मराठा आंदोलकांनी अमोल कोल्हेंना अडवलं; खासदार म्हणाले, मनोज दादा मला ओळखतात
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून विविध जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलक राजकीय नेत्यांना जाब विचारत आहेत.
![मराठा आंदोलकांनी अमोल कोल्हेंना अडवलं; खासदार म्हणाले, मनोज दादा मला ओळखतात Amol Kolhe was intercepted by Maratha protesters in solapur then MP said Manoj jarange know me and maratha reservation stand मराठा आंदोलकांनी अमोल कोल्हेंना अडवलं; खासदार म्हणाले, मनोज दादा मला ओळखतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/12/a0750318dd8c2449c8d75c7e3eda535717234709062771002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु झाला असून आज अहमदनगरमध्ये त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. दुसरीकडे राज्यात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या रॅली, दौरे आणि सभा होत आहेत. त्यासाठी, नेतेमंडळी विविध जिल्ह्यात जात असताना त्यांची अडवणू केली जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) रविवारी सोलापूर दौऱ्यावर गेले असता, त्यांना मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनाही मराठा समाज बांधवांनी अडवून जाब विचारला. त्यावर, आमचा पाठिबा असल्याचे कोल्हेंनी म्हटले.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून विविध जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलक राजकीय नेत्यांना जाब विचारत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना देखील मराठा समर्थकांनी अडवून जाब विचारला आहे. मोहोळ येथील सभा संपल्यानंतर सोलापूरकडे रवाना होताना, मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावेळी, एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देत आंदोलकांनी अमोल कोल्हेंना मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे सूचवले. त्यावर, मराठा आरक्षणाला आमचा 100 टक्के पाठिंबा असल्याचे खासदार कोल्हे यांनी म्हटले. ''आमचा 100 टक्के पाठिंबा आहे, तुम्ही मनोज दादांना विचारा ते मला ओळखतात, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच, पवार साहेबांनी कालच पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय,'' असेही अमोल कोल्हेंनी सांगितलं.
दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतही आरक्षणाचा प्रश्न मांडला होता. त्यावेळी, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भूमिका त्यांनी संसदेत मांडली होती.
आरक्षणाचा हक्क ज्याचा त्याला मिळावा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनीही भूमिका मांडली. दोन समाजात तेढ आणि एकमेकांबाबत टोकाची भावना नसावी. आरक्षणाचा हक्क ज्याच्या त्याला व्यवस्थित मिळावा, ही शरद पवारांची भूमिका आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
बारामतीचा उमेदवार शरद पवारच ठरवतील
युगेंद्र पवार हे युवक आहेत, त्यांनी काम सुरू केलं आहे. पण, बारामती विधानसभा निवडणुकीत उमेदवारी ठरवण्याचे काम पवारसाहेबच करतील, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
नागाने काढला फणा, 3 मुंगसांनी घातली झडप; विमानतळावरील झुंज, व्हिडिओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)