एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'बाहुबली' प्रभास शिर्डी संस्थानचा ब्रँड अॅम्बेसेडर?
अहमदनगर: शिर्डी संस्थानने साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्याचं ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून शिर्डी संस्थानचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्यासाठी मोठी नावं चर्चेत आहेत.
यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन आणि बाहुबली प्रभास यांची नावं आहेत.
शिर्डी संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे यांनी याबाबतची माहिती दिली.
अद्याप यापैकी कुणाशीही संपर्क नाही मात्र शिर्डी संस्थान या सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही सुरेश हावरे यांनी सांगितलं.
शिर्डीचं साई संस्थान हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील एक प्रमुख देवस्थान आहे. देशभरातील भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात.
याच शिर्डी संस्थानाच्या साईबाबा समाधी शताब्दी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठीच सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि प्रभास यांपैकी एकाला ब्रँड अॅम्बेसेडर करण्याची तयारी, शिर्डी संस्थानने केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement