एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अॅमेझॉनकडूनही यूपीआय सुविधा सुरु
यूपीआय सर्व्हिसमध्ये बँक खाते क्रमांक आणि बँक आयएफएससी कोडची गरज लागत नाही. फक्त व्हर्च्यूअल पेमेंट अॅड्रेसच्या साहाय्याने कुठेही पैसे पाठवता येतात.
मुंबई : पेटीएम आणि फोनपेला टक्कर देण्यासाठी अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने भारतात स्वत:ची यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुविधा सुरु केली आहे. अॅक्सिस बँकेशी संलग्न असलेली ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा अॅमेझॉन अॅप्लिकेशनवर मिळणार आहे.
ही सुविधा सुरु करण्यासाठी यूजर्सना त्यांच्या बँक खात्याला यूपीआय अॅपशी लिंक करावं लागणार आहे. यानंतर पेटीएम, फोनपे या अॅप्सप्रमाणे पैसे पाठवू आणि प्राप्त करु शकतात. यूपीआय सर्व्हिसमध्ये बँक खाते क्रमांक आणि बँक आयएफएससी कोडची गरज लागत नाही. फक्त व्हर्च्यूअल पेमेंट अॅड्रेसच्या साहाय्याने कुठेही पैसे पाठवता येतात.
बँकेत पैसे पाठवण्यासाठी किंवा काढण्यासाठी रांग लावावी लागत होती, सोबत अधिक वेळही खर्च व्हायचा. मात्र अशाप्रकारच्या अॅप्लिकेशन्समुळे बँकेतील रांगा कमी होण्यास मदत होत आहे. सोबत वेळही वाचत आहे. त्यामुळे सध्या या अॅप्लिकेशनचा वापर पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी मोठ्याप्रमाणात होत आहे.
सरकारकडून डिजीटल इंडिया करण्यासाठी भीम अॅप्लिकेशन सुरु करण्यात आलं होतं. ज्यामुळे अनेकांना त्याचा फायदा झाला होता. शिवाय गुगलपेसारखे अॅप्लिकेशन सुद्धा मोठ्याप्रमाणात वापरले जात आहे. अशात आता अॅमोझॉन या ई-कॉमर्स कंपनीनेही ही सुविधा सुरु केली आहे. शिवाय व्हॉट्सअॅप पण यूपीआय सुविधा सुरु करणार असल्याची माहिती आहे.
पेटीएम, फोने पे, अॅमेझॉन पे, मोबीक्विक, फ्रिचार्ज या मोबाईल व्हॉलेट अॅप्लीकेशनवर यूपीआय सुविधा उपलब्ध आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
करमणूक
निवडणूक
Advertisement