अवैध गर्भपात प्रकरण! हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत
अकोला (Akola) जिल्ह्यातील हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
Akola News : अकोला (Akola) जिल्ह्यातील हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप केला होता. याबाबतची बातमी एबीपी माझानं प्रसिद्ध केली होती. यानंतर जिल्हा परिषदेने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन गठीत करण्यात आली आहे.
एबीपी माझानं अकोला जिल्ह्यातील हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरप्रकाराची बातमी दाखवली होती
एबीपी माझाची बातमी म्हणजे हमखास 'इम्पॅक्ट'ची हमी असल्याचे आज परत सिद्ध झाले आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरप्रकाराची बातमी दाखवली होती. 'माझा'च्या बातमीच्या दणक्यानंतर लगेच अकोल्याचे जिल्हा परिषद प्रशासन आणि त्यांचा आरोग्य विभाग खडबडून जागा झालं आहे. या बातमीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी हिवरखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे. या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात केले जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यासंदर्भातील बातमी 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर आज जिल्हा परिषदेने एक चार सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. केंद्र सरकारच्या आयुष्यान भारत योजनेत या आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या आरोग्य केंद्राला सरकारने 'आयुष्यमान आरोग्य मंदिरा'चा दर्जा दिला आहे. मात्र, याच आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. या आरोग्य केंद्राचं 'स्टिंग ऑपरेशन'च आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. आमदार मिटकरींनी केलेल्या पाहणी आणि 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये त्यांना रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मासाचे गोळे आढळलेत. त्यामूळे या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याची गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय.
आरोग्य केंद्रात कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीत
हिवरखेड हे 40 हजार लोकसंख्येचं गाव आहे. येथील आरोग्य केंद्राशी सातपुड्याच्या पायथ्याशी असेलली जवळपास 35 आदिवासी खेडी आणि इतर गावं जोडलेली आहेत. मात्र, इतक्या महत्वाच्या असलेल्या आरोग्य केंद्रात कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीत. येथील कर्मचारी वेळेवर हजर रहात नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. रुग्णालयातील यंत्रसामग्री बंद अवस्थेत धुळखात पडल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आली आहे. यासोबतच रुग्णालयात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Akola News: रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात?, अमोल मिटकरींचा धक्कादायक आरोप
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

























