एक्स्प्लोर

Akola Loksabha Elections : अकोल्यात मतदानाची टक्केवारी वाढली; डॉ. अभय पाटील, अनुप धोत्रे की प्रकाश आंबेडकर, नेमका कौल कुणाला?

Akola Loksabha Elections : अकोल्यात यंदा मतदानाची टक्केवारी काही अंशी वाढल्याचे बघायला मिळाले आहे. तर या मतदारसंघात तिरंगी लढत असताना याचा फायदा नेमका कुणाला होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Akola Lok Sabha constituency : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील मतदारांचा कौल मतपेटी बंद झाला आहे.  तर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाची उदासीनता आणि उष्णतेची लाट इत्यादी कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. असे असताना, अकोल्यात (Akola) मात्र काही अंशी मंतदानाची टक्केवारी वाढल्याचे बघायला मिळाले आहे. तर या मतदारसंघात तिरंगी लढत असताना याचा फायदा आपल्यालाच होईल, असा विश्वास या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवारांनी बोलून दाखवला आहे.      

अकोल्यात मतदानाची टक्केवारी वाढली    

अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी वाढलाय. 2019 मध्ये अकोल्यात 59. 76 टक्के मतदान झालं होतं. तर काल झालेल्या मतदानात अकोल्याचा टक्का हा 61.79 टक्क्यांवर गेला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 90 हजार 814 मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख 68 हजार 348 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान केले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या वाढत्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

तिरंगी लढतीत नेमका कौल कुणाला?

दरम्यान, या वाढलेल्या मतदानाचा फायदा हा आपल्यालाच होणार असल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी केलाय. लोकांमध्ये असलेला रोष मतदानातून व्यक्त होत आहे. म्हणूनच ही आकडेवारी वाढल्याचे डॉ. अभय पाटील म्हणालेत. तर आपण एक लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ, असा, विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. दरम्यान, निवडणुकीच्या काळात काही लोकांकडून आपल्याला धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही डॉ. पाटील यांनी केलाय. निवडणुकीच्या काळात आपल्यावर विविध माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही निवडणूक सर्वसामान्य नागरिकांनी हाती घेतली आहे. बहुतांश ठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मतदानाला मिळाले आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील राग आणि चीड मतदानातून व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन नक्की होईल, असा विश्वासही डॉ. अभय पाटील यांनी बोलताना व्यक्त केलाय.

मतदारसंघ एकुण मतदान झालेलं मतदान टक्केवारी
अकोट   300362  192283 64.02%
बाळापूर  300662 200170  68.58%
अकोला (पश्चिम) 332763  182599  54.87%
अकोला (पूर्व) 340802  202294   59.36%
मुर्तिजापूर  300296 193761   64.52%
रिसोड  315929 197241 62.43
एकूण   1890814   1168348  61.79%

महत्वाच्या इतर बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Embed widget