एक्स्प्लोर
आम्ही मुख्यमंत्री केलं तोच आमच्याविरोधातः अजित पवार
साताराः आम्ही आमचे विरोधक म्हणून भाजप-शिवसेनेकडं पाहतो, पण ज्याला आम्ही मुख्यमंत्री केलं तोच बाबा आज आमच्याविरोधात बोलत आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते साताऱ्यात बोलत होते.
...आणि आमचं सरकारच पडलं, पृथ्वीराज चव्हाणांना टोला
आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, तेव्हा सरकार परत निवडून आलं. पण पृथ्वीराज बाबांना मुख्यमंत्री केलं आणि आमचं सरकारच पडलं, असा जोरदार टोला अजित पवारांनी लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण लोकांमध्ये मिसळत नसल्याचा हा परिणाम आहे, असं सांगण्यासही अजित पवार विसरले नाही.
ज्यांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री पद मिळालं त्यांच्याच विरोधात आपण बोलत आहोत, याचा विचार यशवंतराव चव्हाणांच्या सातारा जिल्ह्यातील जनतेने करावा, असंही अजित पवार म्हणाले.
पाहा व्हिडिओः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement