एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवार 60 पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता, निवडणुकीवेळी वाद नको म्हणून आताच सर्व्हे करणार

NCP Vidhan Sabha Election News : विधानसभेच्या अनेक जागांवरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता असून त्यावर सामोपचाराने मार्ग काढण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती आहे.

मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Ajit Pawar NCP) विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कंबर कसली असून आगामी निवडणुकीत 60 पेक्षा जास्त जागा पक्ष लढवू शकतो अशी शक्यता पक्षातील वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जागांवर सर्व्हे (NCP Survey For Maharashtra Vidhan Sabha Election) केला जाणार असून योग्य उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येतंय. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आगामी काळात प्रत्येकजण सर्व्हे करेल आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसे निवडून येतील अशी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया दिली. तर प्रफुल्ल पटेल यांनी आगामी काळात आम्ही सर्वच 288 जागांचे सर्व्हेही करणार असल्याचं म्हटलं आहे. 

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यासह छोट्या घटकपक्षांचे जागा वाटप लवकरच पार पडणार आहे. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वच 288 जागांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सर्व्हेमध्ये महायुतीत सर्वात चांगला रिपोर्ट ज्याचा असेल त्याला संधी देण्यात यावी अशी भूमिका घेतली आहे.

लोकसभेतील अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रवादीचा सर्व्हे

लोकसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत सर्व्हे निगेटिव्ह असल्यामुळे लोकसभेची तिकिट कापण्यात आल्याचा  अनुभव आला. पक्षातील दिग्गज खासदार हेमंत पाटील असोत वा भावना गवळी असोत, त्यांना तिकिट न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी देखील अनुभवायला मिळाली. कदाचित हीच बाब लक्षात घेत आगामी काळात विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसू नये म्हणून पक्षानेच स्वतः सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे.

माढा आणि नगरमध्ये वेगळी परिस्थिती असती

पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, जर अहमदनगर किंवा माढा लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हाला मिळाली असती तर सध्या जी परिस्थिती दिसते आहे ती वेगळी पाहायला मिळाली होती. माढा लोकसभा मतदारसंघासाठी तर आम्ही संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव जवळपास निश्चित केले होते. तर दुसरीकडे तुतारी गटाचे सध्याचे नगरचे खासदार हेच आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असते असं देखील स्पष्ट केलं. 

विधानसभेत राष्ट्रवादी- भाजपमध्ये अनेक जागांवरून वादाची शक्यता

आगामी काळात इंदापूर, कागल, कोपरगाव, पंढरपूर यासह अनेक मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघात पहिल्या क्रमांकाला राष्ट्रवादी असली तरी दुसऱ्या क्रमांकावर भाजप असल्याचं पाहिला मिळत आहे. जशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती काही मतदारसंघात आहे त्याच्या उलटी परिस्थिती भाजपच्या बाबत देखील आहे. हा विषय सामोपचाराने सोडवला जाईल अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.

नवाब मलिकांवरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता

या सगळ्या गोष्टी एका बाजूला असताना दुसरीकडे नवाब मलिक यांचं काय? हा देखील प्रश्न प्रलंबित आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी नवाब मलिक हे आमच्यासोबत असून आगामी विधानसभेला आमच्याकडून त्यांचा विचार नक्कीच केला जाईल अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी नवाब मलिक विषयावरुन महायुतीत खटके उडण्याची दाट शक्यता आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget