कोणाचा घास काढूनही घ्यायचा नाही आणि कोणावर अन्यायही करायचा नाही, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, जाती जातीत वाद होतील असं कृत्य करु नका
राज्याचं हित डोळ्यासमोर ठेऊन काम करताना कुणावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं.
Ajit Pawar : राज्याचं हित डोळ्यासमोर ठेऊन काम करताना कुणावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. ते नागपुरात चिंतन शिबीरात बोलत होते. मागील दोन महिन्यापासून समाजा समाजात तेढ निर्माण केली जातेय, ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाही असे अजित पवार म्हणाले. आपल्या पक्षाला सध्या अडचणीच्या काळातून जावं लागत आहे. हेही दिवस निघून जातील. आपल्याला कुणाचं घास काढून घ्यायचा नाही आणि कुणावर अन्यायही देखील होऊ द्यायचा नाही. जाती जातीत वाद होतील अस कुठलाही कृत्य करायचं नाही असे अजित पवार म्हणाले.
मोठी महत्वाकांक्ष ठेवायला हवी, आपल्याला पक्ष वाढवायचाय
मोठी महत्वाकांक्ष ठेवायला हवी. आपल्याला पक्ष वाढवायच आहे. परिस्थितीला जुळवून घेता आल पाहिजे. तसेच उत्तरदायित्व विसरता कामा नये असे अजित पवार म्हणाले. यासोबत संयम, वेळेच्या बाबत कार्यतत्पर राहायला पाहिजे, पॉझिटिव्हटी ठेवायला पाहिजे. वेळा पाळायला शिका. पुढच्या वेळी जर कोण उशिरा आलं तर दार बंद केलं जाईल असे अजित पवार म्हणाले.
कुणाला अंगावर घेऊ नका, पक्ष नीट सांभाळा
आम्ही अमित शाह यांना भेटलो त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की जातीय द्वेष महाराष्ट्रात चालत नाही. संत तुकडोजी महाराज यांनी सांगितलं आहे पक्षपात न करता काम करत राहायला हवं. हाच आपला मार्ग आहे असे अजित पवार म्हणाले. देशपातळीवर एखादा प्रसंग घडला तर त्यावेळी नवाब मलिक व्यवस्थित भूमिका मांडत होते. सध्या काही प्रवक्ते असं काही बोलून जातात की आगीतून उठून फुपाट्यात पडल्यागत होतं. असं होऊ देऊ नका. कुणाला अंगावर घेऊ नका. पक्ष नीट सांभाळा. पक्षाची प्रतिमा चांगली कशी राहील हे पाहा
सहकार मधून रोजगार कसा निर्माण करता येईल यावर काम केलं जाईल. महिलांसाठी होस्टेल करण्याबाबत देखील निर्णय घेतला जाईल. निवडणुका पार पडल्यानंतर आपण जी आश्वासन देतो ती पूर्ण करणे आपलं काम आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण काम करत आहोत असे अजित पवार म्हणाले. रोजगार वाढविण्यासाठी इनोव्हेशन सेंटर इंक्युबेशन सेंटर आपण आणत आहोत. सी ट्रिपल आयटी शिक्षण याठिकाणी घेतलं जाईल वर्षाला 7 हजार विद्यार्थी यातून बाहेर पडतील. टाटा ट्रस्ट यासाठी मदत करत आहे. 200 कोटी रुपयांच प्रोजेक्ट आहे टाटा ट्रस्ट 165 कोटी रुपये देणार आहे आणि राज्य सरकार 35 कोटी रुपये देणार आहे. तरुणाच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी एक थिंक टैंक तयार करत आहोत. महाराष्ट्र 20250 साठी हे काम करेल असे अजित पवार म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात घेतलेली भूमिकेला आपण ठाम पाठिंबा देतो असे अजित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवार यांची सूचना आहे मला पाळावी लागेल
पक्ष प्रवेश देताना चांगल्या माणसाला प्रवेश द्या अन्यथा आपल्याला ट्रोल केल जातं. प्रत्येकाच्या परिश्रमाचा सन्मान करणे आपलं काम करावं लागेल असे अजित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार म्हणाल्या कुणाला संधी द्यायची हे आपल्याला पहावं लागेल. सुनेत्रा पवार यांची सूचना आहे मला पाळावी लागेल. हे आधीच सांगितलं असतं तर आपला पक्ष कुठल्या कुठ गेला असता असे अजित पवार म्हणाले. आता आम्ही दोघे पण भाषण करत असतो. आधी माझा रात्रभर काय बोलायचं याचा गृहपाठ व्हायचा. आता देखील मी जे बोलतोय त्यावर टिक केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:

























