(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra NCP Political Crisis LIVE : अनिल पाटील यांची अजित पवार गटाच्या प्रतोदपदी निवड
Maharashtra NCP Crisis : महाराष्ट्राच्या राजकारण अभूतपूर्व परिस्थिती ओढावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
LIVE
Background
Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : महाराष्ट्राच्या राजकारण (Maharashtra Politics) अभूतपूर्व परिस्थिती ओढावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.
Sunil Tatkare : राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार करणार घोषणा
Sunil Tatkare : सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार घोषणा करणार आहेत. थोड्याच वेळात अजित पवार अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे.
Maharashtra Political Crisis LIVE : अनिल पाटील यांची अजित पवार गटाच्या प्रतोदपदी निवड
Maharashtra NCP Crisis : अनिल पाटील यांची अजित पवार गटाच्या प्रतोदपदी निवड झाली आहे. खुद्द अनिल पाटील यांनी एबीपी माझाला माहिती दिली. अनिल पाटील यांनी कालच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा शब्द, काँग्रसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा शब्द
अजित पवार यांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही
काँग्रसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
शरद पवार यांच्या स्वागतासाठी पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यात हजर
Maharashtra NCP Crisis : अजित पवार यांच्या समर्थनात आत्तापर्यंत 35 आमदारांनी सह्या केल्या : सूत्र
Maharashtra NCP Crisis : अजित पवार यांच्या समर्थनात आत्तापर्यंत 35 आमदारांनी सह्या केल्या : सूत्र
आज एकूण 42 आमदार अजित पवार यांना पाठिंबा दर्शवणार
अनेक आमदारांना शपथविधी बाबत माहिती नसल्याने आज आमदारांच्या सह्या पार पडणार
10 वाजताच्या बैठकीत पाठींबा देणारे आमदार उपस्थीत रहाणार
देवगिरी निवासस्थानी 10 वाजता बैठक
रुपाली चाकणकर अजित पवार यांच्यासोबत जाणार?
Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी रात्री अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रुपाली चाकणकर कोणासोबत जाणार याबाबत त्यांनी आतापर्यंत भूमिका स्पष्ट केली नाही
मात्र रात्री अजित पवारांची भेट घेतल्याने त्या अजित दादांसोबत जाणार असल्याची चर्चा आहे.