एक्स्प्लोर

Ajit Pawar : सत्तेत गेल्यानंतर अजितदादांची फाईल 'बंद', आता रोहित पवारांचं काय होणार? शिखर बँक घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांचा दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट

Mumbai : मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या याच गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून चौकशी सुरू आहे. पण मुंबई पोलिसांनी आता त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर ईडी काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणात (Maharashtra State Co Operative Bank Scam Case) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक वजनदार नेत्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या याच गुन्ह्याच्या आधारे ईडीचा तपास सुरू आहे. रोहित पवारांचीदेखील (Rohit Pawar) याच प्रकरणात सध्या ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता ईडीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. 

राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यावेळच्या विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. राज्यात भाजपचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर या प्रकरणी अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर याप्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह सर्वच नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येतात पुन्हा या प्रकरणाचा तपास करायचा आहे असं पोलिसांनी कोर्टात सांगितल होतं. त्यानंतर ही फाईल पुन्हा उघडण्यात आली. 

मात्र आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे-फडणवीस सरकारसोबत येताच त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलल्याची चर्चा आहे. 

रोहित पवारांचं काय? 

24 जानेवारी रोजी, ईडीने बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीशी संबंधित रोहित पवार यांची 11 तास चौकशी केली आणि त्यांना 1 फेब्रुवारी रोजी पुन्हा समन्स बजावले. 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांनी ज्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे तो गुन्हाच त्यांनी आता मागे घेतला आहे. त्यासंबंधित क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दिला. त्यामुळे अजित पवार यांना एकीकडे दिलासा मिळाला असला तरी विरोधी पक्षात असलेल्या रोहित पवार यांचं काय होणार अशी चर्चा आहे. एका केस संदर्भात दोन तपास यंत्रणांच्या चौकशीची दिशा वेगळी असल्याने कोणाचा तपास योग्य असा सवाल उपस्थित होत आहे. 

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Embed widget