Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील या प्रकरणात दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करावे, ही विनंती असल्याचे रोहित पवार यांनी मागणी केली आहे.

Rohit Pawar on Shivendrasinh Bhonsle: मंत्र्यांच्या बंगल्यांवरील 30 कोटींची खोटी कामं दाखवून पैसे लाटल्याचा आरोप असणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील या प्रकरणात दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करावे, ही विनंती असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांनी दक्षता व गुणनियंत्रक विभागाने दिलेला अहवाल सुद्धा ट्विटमध्ये जोडला आहे. यामध्ये तक्रारीत तथ्य असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 6, 2025
आपला आदर आहे आणि या सरकारमध्ये बोटावर मोजण्याएवढेच चांगले मंत्री आहेत त्यापैकी एक म्हणून नेहमीच आपल्याकडे बघितलं जातं. मी गेल्या सरकारच्या काळातील मंत्र्यांच्या बंगल्यांवरील ३० कोटींची खोटी कामं दाखवून पैसे लाटल्याचा मुद्दा समोर आणला होता.… pic.twitter.com/54OK2P91ke
दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करावे
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपला आदर आहे आणि या सरकारमध्ये बोटावर मोजण्याएवढेच चांगले मंत्री आहेत त्यापैकी एक म्हणून नेहमीच आपल्याकडे बघितलं जातं. मी गेल्या सरकारच्या काळातील मंत्र्यांच्या बंगल्यांवरील 30 कोटींची खोटी कामं दाखवून पैसे लाटल्याचा मुद्दा समोर आणला होता. सरकारच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाने देखील या संदर्भातला अहवाल तीन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात दिला आहे. हा अहवाल आपणास पाठवत आहे, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील या प्रकरणात दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करावे, ही विनंती!
काय म्हटलं आहे अहवालात?
दरम्यान, दक्षता व गुणनियंत्रक विभागाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, शासन परिपत्रकानुसार बंगल्याची दुरुस्ती करताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते, पण कोणतीही परवानगी घेतलेली दिसत नाही. फर्निचरचे जाॅब बघता अत्यंत महागडे फर्निचर घेतलेले दिसते. भांडार शाखेकडे मागणी करुन सुद्धा त्यांनी माहिती सादर केलेली नाही. सदर विभागातील भांडार शाखेची स्वतंत्रपणे चौकशीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसेच विकत घेतलेल्या फर्निचरची कोठेही नोंद घेण्यात आलेली नाही. सदर बाब गंभीर असल्याचेही दक्षता व गुणनियंत्रण मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांनी आपल्या चौकशी अहवालात म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























