एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : शक्तिपीठ म्हणजे शेतकऱ्यांच्या उरावरुन जाणारा महामार्ग, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway), पन्नास खोके (Pannas Khoke) आणि शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘शेतकऱ्याच्या उरावरून रस्ता नेऊन शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे, याला मुख्यमंत्री विकास म्हणतात’, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचारासाठी जातात पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही हे विचारत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी केवळ ६ रुपये मिळाल्याचा पुरावा देत त्यांनी सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली. सत्तेसाठी दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी आम्हाला घर सोडण्यावरून बोलू नये, असे म्हणत त्यांनी 'पन्नास खोके' घेणाऱ्यांना 'बाजारबसवी' संबोधले.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















