शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
उद्धव ठाकरे यांनी सीएम फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार केलेला दावा तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय पवाराची औलाद सांगणार नाही या ऑडिओ क्लिप ऐकवल्या.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की उद्धव ठाकरे टोमणे मारतात, पण टोमणा नाही, हाच टोला आहे की, माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्स हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सीएम फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार हा केलेला दावा तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय पवाराची औलाद सांगणार नाही या ऑडिओ क्लिप शेतकऱ्यांना ऐकवल्या. धाराशिव दौरा हा निवडणुकीच्या संदर्भात नसून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
पॅकेजच्या घोषणेवर टीका (Critique on Package Announcement)
उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याच्या सरकारने इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज जाहीर केल्याचा दावा केला आहे, पॅकेज म्हणे 31 हजार आठशे कोटी म्हणजे आतापर्यंत इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं. ते म्हणाले की, जाहीर करायला कोणाच काय जातं. जाहीर केलेल्या पॅकेजपैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्षात किती आले? ज्या दिवशी ते सगळे पैसे येतील, त्यावेळेी मुख्यमंत्र्यापेक्षा आनंदी मी असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे यांनी सांगितले की, फडणवीसांनी आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत, शेतकऱ्यांचा सातबारा करुया कोरा, असे निवडणुकीच्या आधी सांगितले होते. आता शेतकरी विचारतात, आता कुठे पळाला चोर, हा मत चोरून सत्तेवर आलाय. ठाकरे यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद करू नका. निवडणुकीच्या आधी त्यांनी सांगितले होते की, आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला 1500 नाही तर ₹2100 देऊ. तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला 2100 रुपये द्या. आता का नाही विचारलं लाडक्या बहिणींना तुम्हाला मिळतात की नाही पैसे? अशी विचारणा त्यांनी केली.
मग नेमकं पैसे जातात कुठे?
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठवाडा दौऱ्यातील प्रतिसाद पाहून साहेब आमच्याकडे पण या आम्हाला सुद्धा काही मिळालेलं नाही, असे शेतकरी म्हणत आहेत, मग नेमकं पैसे जातात कुठे? अशी विचारणा त्यांनी केली. ज्या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकत आहोत त्यामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार होत आहे. मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.
इतर महत्वाच्या बातम्या



















