एक्स्प्लोर

सिडको जमीन प्रकरणात काहीतरी काळबेरं - अजित पवार

विदर्भाला न्याय द्यायचा आहे तर डिसेंबरमध्ये महिनाभर अधिवेशन नागपुरात घ्यायचं होतं, पावसाळ्याची कोणतीही तयारी नसताना अधिवेशन डोक्यावर मारल्याची टीकाही त्यांनी केली.

नागपूर : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या व्यवहारांना स्थगिती दिली याचाच अर्थ त्यात नक्कीच काहीतरी काळबेरं आहे, अस वक्तव्य राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केलं. सिडको जमीन प्रकरणाची आणखीन काही कागदपत्रे आमच्या हाती लागली आहेत. हा विषय लवकरच आम्ही अधिवेशनात मांडणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मागील आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणास स्थगिती देत त्यांनी विधानसभेत या प्रकरणाचा खुलासा केला. “सिडको जमीन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. त्या अनुषंगाने या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे. या जमिनीची विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे महसूल विभागामार्फत कळवण्यात आलं आहे की कोणताही थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण होऊ नये, याबाबतची घबरदारी घेण्यात येईल. जोपर्यंत न्यायलयीन चौकशी होऊन अहवाल येत नाही, तोपर्यंत यासंबंधी कोणतीही कारवाई, जसे विक्री, हस्तांतरण, भाड्याने देणं या सर्वांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे” सिडको जमीन प्रकरणी काँग्रेसचे आरोप नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली १७६७ कोटी रुपयांची जमीन बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांत विकण्यात आली. हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते, सिडको आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या संगनमतानं झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. अधिवेशनाचा दुसऱ्या आठवडा आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस आहे. हिवाळी सोडून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यामागचा उद्देश काय होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "विदर्भाला न्याय द्यायचा आहे तर डिसेंबरमध्ये महिनाभर अधिवेशन नागपुरात घ्यायचं होतं, पावसाळ्याची कोणतीही तयारी नसताना अधिवेशन डोक्यावर मारलं," अशीही टीकाही त्यांनी केली'. नागपुरमध्ये पावसाचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला होता. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं होतं. यावरुनच नागपूर किंवा मुंबई महापालिकेत सरकारचं अपयश दिसून येत असल्याचेही अजित पवार म्हणाले. अजित पवारांची संभाजी भिडे वर टीका संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्याची कीव करावीशी वाटते. मनूने सांगितलेला विचार चुकीचा आहे हे महात्मा फुले, आंबेडकर यांनी सांगितल्याचे अजित पवारांनी सांगितले. आता या विचारसरणीसोबत जायचं की नाही ते बहुजनांनी ठरवायचं असे पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget