एक्स्प्लोर

अजय महाराज बारस्कर सागर बंगल्याबाहेर; देवेंद्र फडणवीसांची भेट न झाल्याने ठिय्या, पोलिसांनी उचललं

एकीकडे अवघ्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीची उत्सव सुरू असतानाच दुसरीकडे आषाढीच्याच दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : राज्यातील आरक्षणाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही, दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) हे सगे-सोयरे आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. तर, शासनस्तरावर सगेसोयरेसंदर्भाने लवकरच अंमलबजावणी होईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, आरक्षणाचा हा गुंता राज्यातील सर्वात जटील प्रश्न बनला आहे. त्यातच, काही महिन्यांपूर्वी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर (Ajay Baraskar) यांची गाडी जाळण्यात आल्यानंतर आता बारस्कर आक्रमक झाले असून ते थेट सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याबाहेरच त्यांनी आपला ठिय्या घातला असून आंदोलन सुरू केल्याचं दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्यामुळे ते सागर बंगल्याबाहेरील ओसरीवर बसले होते, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

एकीकडे अवघ्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीची उत्सव सुरू असतानाच दुसरीकडे आषाढीच्याच दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाल्याचं पाहायला मिळालं. बारस्कर यांना दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने गाडी जळाली की जाळली याचा शोध पोलीस घेत आहेत. अजय महाराज बारस्कर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्याने ही नेमकी जळाली की जाळली, कोणी जाळली आणि का जाळली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेतय. आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ बारस्कर यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. त्यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या  निवासासाठी उभारलेल्या 65 एकरवरील भक्तिसागर पार्कमध्ये पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. त्यावेळी, एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली होती. त्यानंतर, आज अजय महाराज बारस्कर हे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याचं दिसून आलं.

पोलिसांनी घेतलं ताब्यात

बारस्कर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, त्यांना याठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, येथेही त्यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले असून आपणही मराठवाड्यातील सर्वच युवकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

गाडी जळाल्याची पोलिसांत तक्रार 

दरम्यान, गाडी जळाल्यानंतर अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे. या दुर्घटनेत 1 लाखांचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला होता. त्यामध्ये, बारस्कर याना शिवीगाळ आणि धमकी देण्यात येत असल्याचंही पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा

29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा, 4-5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच, मनोज जरांगे म्हणाले...

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget