दुर्दैवी! तुटलेल्या विद्युत तारेचा करंट तळ्यात उतरला; एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू, संगमनेरमधील घटना
Sangamner News : तुटलेल्या विद्युत तारेच्या करंट तळ्यात उतरल्यानं संगमनेर तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. विद्युत तारेला चिकटून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
![दुर्दैवी! तुटलेल्या विद्युत तारेचा करंट तळ्यात उतरला; एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू, संगमनेरमधील घटना Ahmednagar Sangamner News Updates Four Children's Death Due to current Electric shock दुर्दैवी! तुटलेल्या विद्युत तारेचा करंट तळ्यात उतरला; एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू, संगमनेरमधील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/5c5f9cdd7fe6fd68a886ea89167a567e166523339076084_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ahmednagar Sangamner News : तुटलेल्या विद्युत तारेच्या करंट तळ्यात उतरल्यानं संगमनेत तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. विद्युत तारेला चिकटून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील येठेवाडी गावात ही घटना घडली आहे. दर्शन अजित बर्डे (वय 6), विराज अजित बर्डे (वय 5) अनिकेत अरुण बर्डे (वय 6) ओंकार अरुण बर्डे (वय 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
विद्युत तारेला चिटकून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या घटनेनं संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंघोळीसाठी गेलेल्या तळ्यात तुटलेल्या विद्युत तारेच्या झटक्याने ही चारही मुलं दगावली. एकाच कुटुंबातील चौघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घराजवळ असलेल्या तळ्यावर चौघे अंघोळीसाठी गेले होते. वादळी वाऱ्याने तुटलेल्या केबलमध्ये प्रवाह सुरूच असल्यानं ही दुर्दैवी घटना घडली.
(वृत्त अपडेट करत आहोत)
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)