एक्स्प्लोर
Advertisement
मिठाईचे पैसे मागितले म्हणून वीज तोडली
मिठाईचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे उपअभियंता चौगुले यांनी आपल्या मिठाईच्या दुकानातील वीजपुरवठा खंडित केला, असा आरोप तुलसीदास चौधरी यांनी केला आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात 'महावितरण'च्या अधिकाऱ्याचा माजोरडेपणा पाहायला मिळाला आहे. मिठाईचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे उपअभियंता चौगुले यांनी तुलसीदास चौधरी यांच्या मिठाईच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केला.
वीज तोडल्यामुळे 70 हजाराचं नुकसान झाल्याचा दावा मिठाई दुकानदार तुलसीदास चौधरी यांनी केला आहे. नुकसान भरपाई आणि उपअभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चौधरींनी केली असून या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
चौधरी यांचं श्रीगोंदा शहरात 'तुलसी स्वीट होम' नावाचं मिठाईचं दुकान आहे. उपअभियंता चौगुले यांनी त्यांच्या दुकानात मिठाई घेतल्यावर दुकानदारानं पैशाची मागणी केली. मात्र चौगुले यांनी मी महावितरणचा उपअभियंता असल्याचं सांगत पैसे देण्यास नकार दिला. इतकंच नाही, तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशाराही दिला.
स्वीट होमला नवीन मीटर बसवून वाढीव युनिटचे बिल भरण्यास चौगुलेंनी बजावलं. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी आधी दिली, त्यानंतर वीजपुरवठा खंडित केला, असा आरोप चौधरींनी केला आहे.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. महावितरणचं पथक कारवाईला गेल्यावर हा आरोप करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. अर्जाची सत्यता पडताळून निर्णय घेणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement